बीबीदारफळ मधून भाजपकडून इंद्रजीत पवार निवडणुकीच्या रिंगणात….
पवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत दाखल केला उमेदवारी अर्ज...

सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ या गटातून भारतीय जनता पार्टीच्या वतीने इंद्रजीत पवार यांनी मोठी मोटर सायकल रॅली काढून शक्ती प्रदर्शन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
मार्डी गावातून निघालेली मोटर सायकल रॅली छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, चार हुतात्मा स्मारक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून उत्तर तहसील कार्यालयात आली.
यावेळी माजी आमदार दिलीप माने, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश नेते शहाजी पवार, बाजार समितीचे संचालक अविनाश मार्तंडे, ज्येष्ठ पत्रकार अरुण बारसकर, सुनील जाधव, माजी सभापती संध्याराणी पवार, विनायक सुतार, श्रीमंत बंडगर, तात्या मगर, कुमार भिंगारे, शाम शिंदे, बाबासाहेब पाटील, बाळासाहेब पाटील, शिवाजी सोनार यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला.
बी बी दारफळ गणातून सुनीता अरुण बारस्कर, मार्डी गणातून तेजस्विनी अमोल बोराडे यांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. ज्येष्ठ पत्रकार अरुण बारसकर यांच्या पत्नीला पंचायत समितीच्या निवडणुकीत बीबी दारफळ गणातून भाजपने उमेदवारी दिली आहे.



