maharashtrapoliticalsocialsolapur

सुधीर खरटमल यांच्याकडून मनोहर सपाटे यांच्या न्यायप्रविष्ठ प्रकरणाबाबत दिलगिरी !…

सोलापूर – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी महापौर आणि मराठा समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष मनोहर सपाटे यांनी आपल्यावर अन्याय झाला असून हनिट्रॅप प्रकरणात गोवण्यात आल्याचे सांगत आपले राष्ट्रवादीमधून निलंबन रद्द करण्यात यावे, याबाबत आपणास एक पत्र दिले होते. त्या पत्राचा आधार घेऊन आपण मनोहर सपाटे यांच्या कार्याविषयी माध्यमातून बोललो होतो. तसेच त्यांच्याबाबत सुरू असलेल्या न्यायप्रविष्ठ प्रकरणाबाबत चुकून बोललो आहे. मनोहर सपाटे यांच्या निलंबनाबाबतचा निर्णय पक्षाचे प्रमुख शरद पवार तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे घेणार आहेत. त्यामुळे न्यायप्रविष्ठ प्रकरणामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आपण दिलगिरी व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी दिली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

कोणाच्याही जाणीवपूर्वक भावना दुखावण्याचा प्रश्न येत नाही. मनोहर सपाटे यांचे निलंबन आणि न्यायप्रविष्ठ प्रकरणासंदर्भात आपण प्रतिक्रिया दिल्यानंतर मराठा समाजातील ज्येष्ठ नेते तसेच पिडीत महिलेचे वकिल योगेश पवार यांनी फोन करून आपणास विचारणा केली. तेव्हाही आपण या प्रकरणी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो, असे त्यांना सांगितले असल्याचे सुधीर खरटमल यांनी सांगितले..

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button