maharashtrapoliticalsocialsolapur

अण्णप्पा काडादी प्रशालेत गुरुपौर्णिमा म्हणजेच व्यास जयंती मोठया उत्साहात साजरी…

 

सोलापूर:–

दिनांक 10/07/ 2025

कर्नाटक लिंगायत एज्युकेशन सोसायटी, बेळगावी (के. एल.ई.) संचलित अण्णप्पा काडादी हायस्कूल सोलापूर, येथे *गुरुपौर्णिमा म्हणजेच व्यास जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी शालेय स्थानिक नियामक मंडळ अध्यक्षा सिंधूताई काडादी, प्रमुख पाहुणे प्रशालेचे माजी विद्यार्थी व रावजी सखाराम हायस्कूलचे मुख्याध्यापक भारत केत यांच्या शुभहस्ते महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले*.
या कार्यक्रमाचे *प्रास्ताविक मुख्याध्यापक अनिल पाटील* यांनी केले, आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी प्राचीनकाळी असलेली गुरुपरंपरा आणि अर्वाचीन काळातील गुरुपरंपरा एकच असून आजही गुरू सर्वार्थाने विद्यादानाचे कार्य करीत असतात,शिष्याने ते आत्मसात करावे हे सांगितले तसेच गुरुमहिमा सांगितला.
*याप्रसंगी श्वेता भोसले, स्वराली गुंड, शिवराज गयाळे,धनश्री सुरवसे, धनश्री तारापुरे विद्यार्थ्यांनी मनोगतातून* गुरुमहिमा सांगत जीवनातील गुरुचे स्थान, आई हीच पहिली गुरू होय,गुरुविण कोण दाखवील वाट अशी माहिती सविस्तरपणे सांगितली.

 

याप्रसंगी प्रशालेतील विभागातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग यांना *प्रमुख पाहुणे प्रशालेचे माजी विद्यार्थी व रावजी सखाराम हायस्कूलचे मुख्याध्यापक भारत केत व स्थानिक नियामक मंडळ अध्यक्षा सिंधूताई काडादी यांच्या हस्ते भेटवस्तू व गुलाबपुष्प देऊन सन्मानित* करण्यात आले.
*पाहुण्यांचा परिचय सौम्या कन्नी,शिक्षकवृंद यादी वाचन शिवगंगा कोळी व गौरी वाघमारे या विद्यार्थिनींनी केले.तसेच सूत्रसंचालन अजबदी काटे,विजय कोरे(७वीब) तर आभार प्रदर्शन गौरम्मा हिरेमठ हिने केले.
स्थानिक नियामक मंडळ अध्यक्षा सिंधूताई काडादी यांनी आपल्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना प्रयत्नाचे,सातत्याचे महत्त्व व भारतीय संस्कृतीत असलेली गुरुशिष्य परंपरा सांगितली, विद्यार्थ्यांनी ज्ञान आत्मसात करावे असेही त्यांनी सांगितले.

 

कार्यक्रमास स्थानिक नियामक मंडळ अध्यक्षा सिंधुताई काडादी,प्रमुख पाहुणे भारत केत,मुख्याध्यापक अनिल पाटील, पर्यवेक्षक दत्तात्रय पाटील,प्राथमिक मुख्याध्यापक सचिन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

 

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सांस्कृतीक विभाग प्रमुखा अंजली घाटे यांनी परिश्रम घेतले,धरेश्वर तडलगी यांनी सुंदर फलकलेखन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button