politicalmaharashtrasocialsolapur

कुंभार वाड्यातील लगीनघाई कार्यक्रमात प्रभाग ०७ भाजपा पॅनल उमेदवार पूर्णवेळ राहून घेतले आशीर्वाद…

सोलापूर

श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेतील प्रमुख ०४ मानकरी पैकी कुंभार वाड्यातील ५६ घागरी हिरेहब्बू वाड्यात सुपूर्द करण्याच्या १००० वर्षाची परंपरा असणाऱ्या विधीवत कार्यक्रमाला प्रभाग ०७ भाजपा पॅनल उमेदवारांना सहभागी होऊन याची देही, याची डोळा पाहण्याचा सुवर्ण योग कुंभार वाड्यातील प्रमुखांनी दिला.

 

 

 

कुंभार वाड्यात प्रारंभी श्री सिद्धरामेश्वर प्रतिमा व ५६ घागरीचे मानकरी मल्लिकार्जुन म्हेत्रे कुंभार, योगीराज कुंभार, महादेव कुंभार यांच्या प्रमुख उपस्थित पारंपरिक विधीवत पूजन वेदमूर्ती इराण्णा स्वामी यांच्या शास्त्रोक्त पूजनाने करण्यात आले. त्यानंतर वाजत गाजत ५६ घागरी मानकरी हिरेहब्बू वाड्यात सुपूर्द करण्यात आले.

 

 

यावेळी मानकरी राजशेखर हिरेहब्बू, मल्लिकार्जुन म्हेत्रे कुंभार, योगीराज कुंभार, महादेव कुंभार, श्रीकांत अक्कलकोटे, आकाश कुंभार, सुरेश ममदापूरे, संपद जाधव, श्रीशैल मठपती, रोहित कुंभार, अभिषेक कुंभार, शुभम अहंकार आदींसह कुंभार वाड्यातील मानकरी अन् सेवेकरी उपस्थित होते.

 

कुंभार वाडा हे प्रभाग ०७ मध्ये येतो त्यामुळे प्रभाग ०७ भाजपाचे अधिकृत उमेदवार पद्माकर नाना काळे, सौ. उत्तरा बरडे – बचुटे, आनंद कोलारकर, सौ. श्रध्दा किरण पवार यांनी या पारंपरिक कार्यक्रमास पूर्णवेळ उपस्थित राहून श्री सिद्धरामेश्वरांचे आशीर्वाद घेऊन पुढील प्रचारास मार्गस्थ झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia