crimemaharashtrapoliticalsocialsolapur

फौजदार चावडी पोलीस ठाणे, सोलापूर शहर D. B. पथकाची कामगिरी…

सोलापूर

मारहाण व जबरी चोरी करुन मोटारसायकल घेवुन पळुन गेलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारास फौजदार चावडी पालीस ठाणे, येथील डी. बी. पथकाने त्याच्या मुसक्या आवळुन ०२ तासांच्या आत जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला.

 

 

आज दिनांक. २४/११/२०२५ रोजी फिर्यादी नामे-सोहेल मुनाफ पिरजादे वय-३० वर्षे, व्यवसाय-खा. नोकरी, रा. फ्लॅट नं.०५, सेंट्रल प्लाझा अपार्टमेंट, पाथरुट चौक, अशोक चौक, सोलापूर यांनी पोलीस ठाणेस समक्ष हजर राहुन कळविले की, आज दि.२४/११/२०२५ रोजी पहाटे ०५.०० वा.च्या सुमरास ते शोहेब पान शॉप, विजापूर वेस, सोलापूर येथे चहाचे दुकान उघडण्याची वाट बघत थांबलेले असतांना त्यांना इसम नामे अशरफअली ऊर्फ टेपु मन्नान बागवान याने त्यांना मारहाण करून त्यांची सुझुकी कंपनीची बर्गमॅन मॉडेलची दुचाकी क्रं.MH-13 DK 5010 जबरदस्तीने घेवुन गेला आहे असे हकिकत सांगितली. सदर आरोपीत याचे बाबत माहीती घेता तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्यास दोन वर्षाकरीता सोलापुर शहर व जिल्हा तसेच धाराशीव जिल्हा हददीतुन तडीपार केले असल्याची माहीती प्राप्त झाली. सदर इसम यांची तक्रार तात्काळ नोंद करुन त्याप्रमाणे गु.र.नं.८५६/२०२५ भा.न्या. सं कलम ३०९ (६) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.

 

 

 

 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राउत यांनी तात्काळ गांर्भीर्य लक्षात घेवुन डी. बी. पथकास सदर आरोपीताचा शोध घेण्यास सांगीतले. त्याप्रमाणे फौजदार चावडी डी. बी. पथकाने तात्काळ तपास सुरु करुन ०२ तासाचे आत सदर आरोपीत हा सोलापुर शहर सोडुन बाहेर जाण्याचे आत त्यास ताब्यात घेतले व त्याचेकडुन फिर्यादी यांची जबरी चोरी केलेली सुझुकी कंपनीची बर्गमॅन मॉडेलची दुचाकी क्र.MH-13 DK 5010 ही हस्तगत केली व सदर तक्रारीची तात्काळ दखल घेवुन कौशल्यपुर्ण व वेगवान तपास करुन दोन तासात गुन्हा उघड आणला आहे.

 

 

सदरची कामगिरी

सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री. एम राजकुमार साो, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ) श्री. विजय कबाडे मा. सहा. पोलीस आयुक्त विभाग-१, प्रताप पोमण, वपोनि महादेव राऊत, दुपोनि तानाजी दराडे, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षिरसागर, सपोनि/जाधव, पोह/प्रविण चुंगे, पोकॉ/अजय चव्हाण, पोकॉ/ ज्ञानेश्वर गायकवाड, पोकॉ/शशिकांत दराडे, पोकॉ/कृष्णा बडुरे, पोकॉ/विनोद व्हटकर, पोकॉ/विनोदकुमार पुजारी, यांनी केलेली आहे.

सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button