व्यवसायासाठी अवैधरित्या घरगुती गॅसचा वापर करणाऱ्या बाळीवेस येथील श्री अन्नपूर्णा लंच होमवर पुरवठा विभागाची ,HP, indian, भारत गॅस यांच्यासमवेत संयुक्तिक कारवाई…
फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू...

सोलापूर
वास्तविक घरगुती गॅस टाक्यांचा वापर हा रोजच्या दैनंदिन मूलभूत वापरासाठी असताना बाळीवेस येथील श्री अन्नपूर्णा लंच होम साठी व्यावसायिक स्वरूपात वापरताना बुधवारी पुरवठा विभागाच्या निदर्शनास अचानक टाकलेल्या धडक कारवाई दरम्यान निदर्शनास पडले.पुरवठाविभागाने ,भारत ,इंडियन,HP यांच्या समवेत बुधवारी अचानक कारवाई केली.या धाडी दरम्यान या ठिकाणी १ भारत गॅस कंपनीची भरलेली टाकी व्यवसायासाठी वापरतानाचे दृश्य निदर्शनास पडले.याबाबत आता फौजदार चावडी पोलीस ठाण्यात संबंधित व्यापाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई पुरवठा विभागाचे अ परिमंडळ अधिकारी नंदकिशोर ढोके, ड परिमंडळ अधिकारी प्रफुल नाईक , ब. प्र.परिमंडळ अधिकारी राजेश यमपुरे , ब पुरवठा निरीक्षक ज्ञानेश्वर काशिद , ड पुरवठा निरीक्षक सज्जन भोसले , सागर चव्हाण , HPCL सेल्स अधिकारी ,IOCL सेल्स अधिकारी गौतम सागर , BPCL सेल्स अधिकारी रघुकुमार व त्या कंपनींच्या कर्मचाऱ्यांसह यशस्वी पणे पार पाडण्यात आली.
या कारवाई मुळे छुप्या पद्धतीने व्यवसायासाठी घरगुती गॅस चा वापर करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.यापुढे देखील अशा प्रकारच्या कारवाई चालूच राहील . व्यावसायिकांनी दिलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी K City news शी बोलताना सांगितले…



