अँड राजेश कांबळे खून खटल्यास पुन्हा प्रारंभ : दोघांच्या महत्त्वपूर्ण साक्षी:- अँड. उज्वल निकम…

सोलापूर
ॲड. राजेश श्रीमंत कांबळे वय 45 राहणार 43, ब्रह्मचैतन्य नगर नवीन आर. टी. ओ. सोलापूर याचा खून केल्याप्रकरणी आरोपी संजय उर्फ बंटी महादेव खरटमल, अँड सुरेश तारू चव्हाण व श्रीनिवास महांकाळी येलदी यांच्यावर भरलेल्या खटल्याच्या सुनावणी *जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.जे.जे.मोहिते* यांच्यासमोर सुरू झाली.
आज रोजी साक्षीदार नाझिया सोहेल चौधरी* हिने आपले साक्षीत आरोपी बंटी उर्फ संजय हा तिच्या घराशेजारी राहत होता व दिनांक 11/06/2019 रोजी आरोपी बंटी यांच्या घरातून घाण वास येत असल्याची महत्त्वपूर्ण साक्ष नोंदविली.
तदनंतरचा *साक्षीदार संजय राठोड पोलीस उपनिरीक्षक* यांनी आपले साक्षीत त्याने मयत राजेश कांबळे यांच्या मरणोत्तर पंचनामा हा सिव्हिल हॉस्पिटल येथील शवागृहामध्ये केला तेथे मयताचे धड, दोन हात, दोन पाय व मुंडके होते तसा पंचनामा दोन पंचा समक्ष केला.
तसेच मयताचे कपडे जप्तीचा दोन पंचासमक्ष पंचनामा केला.
तसेच आरोपी बंटी खरटमल याने मयत राजेश कांबळे याची गाडी अक्कलकोट स्टेशन येथे लपवून ठेवली आहे व गाडीची चावी जेथे फेकून दिली आहे ते ठिकाण दाखवतो असे निवेदन दिले. ते निवेदन दोन पंचा समक्ष नोंदविले. त्यानंतर आरोपी बंटी खरटमल हा जसा मार्ग सांगेल त्याप्रमाणे त्याच्यासोबत पोलीस व दोन पंच हे अक्कलकोट रेल्वे स्टेशन येथे गेले तेथून त्याने लपवून ठेवलेली ज्युपिटर गाडी व गाडीची चावी ही आरोपी बंटी खरटमल याने काढून दिली त्याप्रमाणे दोन पंचा समक्ष पंचनामा केला.अशी महत्वपूर्ण साक्ष नोंदवली.
त्यावर आरोपींच्या वकिलांनी घेतलेल्या उलट तपासास साक्षीदारांनी नकारात्मक उत्तरे दिली.
तर खटल्यास 20/11/2025 ही तारीख नेमली.
या खटल्यात विशेष सरकारी वकील अँड. उज्वल निकम, मूळ फिर्यादीतर्फे अँड.मिलिंद थोबडे अँड.विनोद सूर्यवंशी तर आरोपी नंबर 1 तर्फे अँड राजेंद्र फताटे, आरोपी नंबर 2 स्वतः आरोपी नंबर ३ तर्फे अँड जयदिप माने हे काम पाहत आहेत.



