crimemaharashtrapoliticalsocialsolapur
पूरग्रस्तांसाठी जिल्हा सरकारी वकील कार्यालयाचा पुढाकार..

सोलापूर
राज्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे.अनेकांची घरे उद्धवस्त झाली आहे. शासकीय यंत्रणे सोबतच सर्व स्तरातून मदतीचा ओघ सुरू आहे.याच पार्श्वभूमीवर जिल्हा सरकारी वकील कार्यालय सोलापूर { विधी व न्याय विभाग } यांच्यावतीने पूरग्रस्तांसाठी प्रत्येकी पाच हजार अशा एकूणच पंच्याहत्तर हजार रुपयांचा चेक सेवा भारती या संस्थेस संस्थेचे पदाधिकारी सुनील इंगळे, राजुसा काटवे यांच्याकडे प्रदान करण्यात आला.
यावेळी जिल्हा सरकारी वकील ॲड प्रदीपसिंग राजपूत व जिल्हा सरकारी वकील कार्यालयाकडील ॲड.दत्ता पवार, ॲड.देशपांडे, ॲड. कुर्डुकर,ॲड. गंगाधर रामपुरे, ॲड. शैलजा क्यातम, ॲड. जन्नू,संग्राम पाटील, शांतीनाथ मेढेगिरी, शिवाजी होटकर, डोके , देशमुख ,गोरे, वांगीकर, दुलंगे , सर्वच यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती…



