maharashtrapoliticalsocialsolapur

‘विकास‎‎ हा‎ आमचा धर्म’; आंबेडकर‎‎ चळवळीचा‎ ऐतिहासिक‎ आरंभ-अण्णा‎ बनसोडे

 

 

 

किसन‎‎ जाधव आणि नागेश‎ गायकवाड‎ यांच्या‎‎ प्रयत्नातून रामवाडीत‎ १‎‎ कोटींची‎ भव्य‎ सांस्कृतिक उभारणी‎ भूमिपूजन‎ संपन्न

सोलापूर -‎ प्रभाग‎ क्रमांक‎ २२‎‎ च्या‎ विकासाचा‎ नवा‎ इतिहास‎ लिहिला गेला‎ राष्ट्रवादी‎ काँग्रेस पार्टीचे‎ राष्ट्रीय अध्यक्ष‎‎ व‎‎ राज्याचे‎ उपमुख्यमंत्री अजित‎ पवार‎ यांच्या विशेष‎‎ निधीतून,‎‎ प्रदेशाध्यक्ष‎‎ खासदार सुनील‎ तटकरे‎ यांच्या‎‎ सक्रिय सहकार्याने रामवाडीला‎ तब्बल १‎‎ कोटी रुपयांचा‎ विक्रमी‎‎ निधी मंजूर‎ झाला‎‎ आहे.
प्रदेश‎‎ उपाध्यक्ष‎‎ किसन‎‎ जाधव‎ आणि‎‎ कार्यसम्राट नगरसेवक नागेश‎‎ गायकवाड‎ यांच्या‎ सातत्यपूर्ण‎‎ धडपडीचे‎‎ हे‎‎ फलित‎ असून,‎ आंबेडकरी‎ समाजासाठी‎ हा दिवस‎‎ विकासाचा‎‎ निर्णायक‎‎ टप्पा ठरला.‎ या‎ निधीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर‎‎ सांस्कृतिक भवन‎‎ आणि‎ लोकशाहीर‎‎ अण्णाभाऊ‎ साठे‎ सांस्कृतिक‎ भवन या दोन‎‎ भव्य‎ प्रकल्पांना प्रत्येकी‎‎ ५०‎‎ लाखांची‎ भक्कम‎‎ तरतूद‎ करण्यात आली‎ असून,‎ या‎ दोन्ही‎ योजनांचे‎ भूमिपूजन‎‎ विधानसभेचे‎ उपाध्यक्ष‎ व‎‎ राष्ट्रवादीचे‎‎ सहसंपर्क‎‎ मंत्री‎ अण्णा बनसोडे यांच्या‎ हस्ते‎ अत्यंत‎ उत्साहात‎‎ पार‎ पडले.‎ दरम्यान‎‎ यावेळी‎ रामवाडी‎‎ परिसरातील‎ श्रद्धास्थान‎‎ अंबाबाई मंदिरात तुळजापूरच्या‎‎ तुळजाभवानी‎ इतकेच भक्तांची आढळ‎ श्रद्धा‎‎ असून‎‎ या देवीचे‎‎ अण्णा बनसोडे यांनी‎ मनोभावे‎ दर्शन‎ घेतले‎ दर्शनानंतर‎ इच्छा‎‎ भगवंताची‎‎ परिवारातर्फे‎ क्रेन‎ द्वारे‎ अण्णा साहेबांना‎ भव्य हार घालून‎ जल्लोषात स्वागत‎ करण्यात‎ आले‎ “राष्ट्रवादी पुन्हा” या गाण्याच्या‎ ठेक्यावर कार्यकर्त्यांनी‎‎ निनाद‎ करत‎ उत्साहन‎ शिगेला‎‎ पोहोचवला.‎‎

 

 

यावेळी‎‎ व्यासपीठावर‎‎ राष्ट्रवादी‎ शहर‎‎ जिल्हाध्यक्ष‎ संतोष पवार,‎ कार्याध्यक्ष‎‎ जुबेर‎ बागवान,‎ इच्छा‎‎ भगवंताची‎‎ परिवाराचे‎ मार्गदर्शक‎‎ तथा‎ आधारस्तंभ‎ लक्ष्मण‎ मामा‎ जाधव,‎ प्रदेश सचिव‎ इरफान‎ शेख,‎ आनंद‎ मुस्तारे, प्रदेश‎ युवक‎‎ सरचिटणीस‎ चेतन‎ नागेश गायकवाड, माजी नगरसेविका नूतन‎ प्रमोद‎‎ गायकवाड, संजय‎‎ भडंगे,‎ सुनील कांबळे, जनरल‎ सेक्रेटरी‎‎ प्रमोद‎‎ भोसले,‎ महिला‎‎ आघाडी‎ कार्याध्यक्ष चित्रा‎ कदम,‎ शामराव गांगर्डे,‎ पंचशीलक‎ मंडळाचे‎‎ प्रमुख‎‎ सागर‎‎ कांबळे,‎ संतोष‎ उर्फ‎ ऋतिक‎ गायकवाड,‎ दीपक‎‎ गायगवळी,‎‎ महात्मा‎ फुले प्रशालेचे‎‎ संस्थापक‎ गायकवाड मामा,‎‎ राजू‎‎ काका‎‎ जाधव,‎ शोभाताई‎‎ गायकवाड, लक्ष्मी‎ कांबळे,‎ मीना‎‎ गायकवाड,‎ सरोजनी‎‎ जाधव,प्रमिला‎ स्वामी, योजना‎ कामतकर,‎ विद्यासागर‎ उर्फ पिंटू‎ जाधव, उत्तम‎ कदम, बाशा‎ शेख, श्याम‎ जाधव,‎ सिकंदर‎ शेख,‎ कोशेन‎ कुरेशी,‎ रवींद्र‎ गायकवाड,‎ डॉली‎ जाधव,‎‎ माऊली जरग, वृषभ‎‎ पेटी,‎‎ वसंत कांबळे,‎‎ माणिक‎ कांबळे,‎‎ फिरोज‎ पठाण,‎ सचिन अंगडीकर‎‎ आदींसह‎ ईच्छा‎‎ भगवंताची‎ परिवाराचे‎ सदस्य उपस्थिती‎‎ होती.‎ उपस्थित मान्यवरांचे‎ स्वागत‎ व सत्कार‎ किसन‎‎ जाधव,नागेश‎ गायकवाड‎‎ आणि‎ चेतन‎ गायकवाड‎‎ यांनी‎‎ केले.

 

कार्यक्रमाच्या‎ सुरुवातीला गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब‎ आंबेडकर,‎ महात्मा‎ फुले‎‎ आणि‎ अण्णाभाऊ‎ साठे‎ यांच्या प्रतिमांचे‎ पूजन‎ करण्यात‎‎ आले.‎ त्यानंतर‎ छत्रपती‎‎ संभाजीनगर येथून‎ आलेल्या‎ भिक्खूंच्या उपस्थितीत‎ बौद्ध‎ स्तोत्र‎‎ पठणाने‎‎ संपूर्ण‎ परिसर‎ भारावून‎‎ गेला.‎‎ सर्वात भावनिक क्षण म्हणजे चिवरदान‎ सोहळा,‎ ज्यात‎ अण्णा‎‎ बनसोडे‎ यांनी‎ भिक्खूंना चिवर‎‎ अर्पण‎‎ करीत बौद्ध‎ परंपरेप्रती‎ आदर आणि‎ सामाजिक‎ बांधिलकी‎ व्यक्त‎‎ केली.‎‎

 

निधीचे‎ महत्त्व अधोरेखित‎ करताना अण्णा बनसोडे म्हणाले,‎‎ प्रभाग २२‎ च्या विकासाचे‎ घोडे‎ वेगाने‎ धावण्यामागे‎ जाधव–गायकवाड‎‎ यांची‎ तळमळ‎ आहे.‎ त्यांच्या‎‎ जिद्दीमुळेच‎‎ आंबेडकरी‎ समाजाला आधुनिक,‎ दर्जेदार‎ सांस्कृतिक‎‎ पायाभूत सुविधा‎ मिळत आहेत. विकास‎ आणि सर्वधर्मीयांची‎ एकजूट‎‎ हीच‎ राष्ट्रवादीची‎‎ खरी ओळख‎ आहे.

 


यावेळी‎‎ बोलताना किसन जाधव‎ यांनी‎ रमाई‎ घरकुल‎ योजनेतील‎‎ जाचक‎ अटी तातडीने‎ शिथिल‎ करून‎‎ वास्तविक‎‎ गरजू‎ लाभार्थ्यांना‎ मदत‎ मिळावी,‎‎ अशी‎ सकारात्मक मागणी अण्णा‎‎ बनसोडे‎‎ यांच्याकडे‎ केली.

तसेच प्रभागात‎ आणखीन कोट्यवधी‎ रुपयांचा‎ निधी‎ खेचून आणण्याचा‎ निर्धारही‎ त्यांनी व्यक्त‎‎ केला.‎‎ कार्यक्रमात‎‎ आणखी‎ एक‎ महत्त्वाचा उपक्रम‎‎ पार पडला‎‎ ईच्छा‎ भगवंताची‎‎ परिवाराच्या‎ वतीने तब्बल दोन‎ हजाराहून‎ अधिक‎‎ महिलांना‎‎ साड्यांचे‎‎ वाटप‎ करण्यात‎ आले,‎ ज्यामुळे‎ कार्यक्रमाला सामाजिक समतोलाचा‎ आणि‎ लोकाभिमुखतेचा‎‎ सुंदर‎ स्पर्श‎ लाभला.‎‎ हजारो नागरिकांच्या‎‎ जंगी‎ उपस्थितीत‎‎ साजरा‎‎ झालेला‎ हा‎‎ सोहळा रामवाडीच्या‎‎ विकासदिशेने‎ उचललेले सुवर्ण‎‎ पाऊल‎ ठरला.‎‎

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button