crimemaharashtrapoliticalsocialsolapur

जागा बळकावणारा सराईत गुंड अर्जुन सलगर हा स्थानबध्द पोलीस आयुक्तांचा दणका…

सोलापूर शहरातील फौजदार चावडी व एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार, अर्जुन सिद्राम सलगर, वय ४५ वर्षे, रा. शिवाजी नगर, वाळे, सोलापूर हा मागील काही वर्षापासुन सातत्याने इच्छापुर्वक दुखापत करणे, जबरी चोरी करणे, खंडणी मागणे, आगळकी करणे, कट रचणे, जागा बळकावणे, चोरी करणे, विनयभंग करणे, धाकदपटशा करणे, गैरकायद्याची मंडळी जमविणे, घातक शस्त्रांनी धमकवणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला आहे. त्याच्या विरुध्द सोलापुर शहर पोलीस आयुक्तालयात एकुण १४ गुन्हे दाखल आहेत. त्याचे या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापुर शहरातील नागरीकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन, सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे. अर्जुन सिद्राम सलगर याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे, त्याची सोलापुर शहरातील व्यापारी व सामान्य नागरीकांमध्ये दहशत असुन, त्याचे विरुध्द सामान्य नागरीक उघडपणे पोलीसांना माहीती देत नाहीत.

अर्जुन सिद्राम सलगर यास, त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन २०११ मध्ये क. ११० (ई) (ग) फौ.प्र.सं अधिनियमानुसार व क.३ एमपीडीए कायदयान्वये प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या. त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी वरीलप्रमाणे गुन्हेगारी कृत्य त्याचे साथीदारांच्या मदतीने संघटीतपणे चालु ठेवली. त्यामुळे त्याचे गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी, मा.एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापुर शहर यांनी, दि.३१/१०/२०२४ रोजी त्याचे विरुध्द एमपीडीए अधिनियम, १९८१ चे कलम ३ अन्वये स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित करुन, त्याची रवानगी येरवडा कारागृह, पुणे येथे करण्यात आहे.

सदरची कारवाई ही, मा. एम. राज कुमार, मा. पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली, मा. डॉ. दीपाली काळे पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा), राजन माने, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे, प्रताप पोमण, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग-०१, सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे, अरविंद माने, वपोनि, फौजदार चावडी पोलीस ठाणे, एमपीडीए पथकातील सपोनि/तुकाराम घाडगे व अंमलदार पोहेकॉ-/८३३ विनायक संगमवार, पोहेकॉ/१२५४ सुदीप शिंदे, पोशि/१९१६ अक्षय जाधव, पोशि/६५४ विशाल नवले यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button