उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होईल-प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे…
दीपावलीनिमित्त इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं तटकरे परिवारांचा विशेष सत्कार...
सोलापूर –
इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं दीपावलीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे, महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांचा रायगड येथील गीता बाग सुरत वाडी तालुका रोहा येथे विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांना महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी यांचं अस्सल सोलापुरी चादरीमध्ये विणलेले प्रतिमा देऊन त्यांचा विशेष सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
तसेच महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांना शिर्डीचे साईबाबा यांची स्केच प्रतिमा देऊन तसेच माजी आमदार अनिकेत तटकरे यांना सोलापूर चादरी मध्ये विणलेल्या श्री तिरुपती बालाजी फोटो,शाल,पुष्पगुच्छ व सोलापुरी चादर ,टॉवेल,नॅपकिन भेट देण्यात आले.
याप्रसंगी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर उपाध्यक्ष उमेश जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर सरचिटणीस अभिजीत कदम, महादेव राठोड, पवन बेरे, आदींचे प्रमुख उपस्थिती होती.
येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतींच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे येणाऱ्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महायुतीचे सरकार येईल आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होतील अशी मनोकामना यावेळी राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केलं.
दरम्यान सोलापूरी चादर हे जगभर ब्रांडींग व्हावं या उद्देशाने सोलापूरची शेंगा चटणी, कडक भाकरी अशा खाद्य संस्कृतीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आम्ही नेहमी अग्रेसर असतो आज विशेषतः दीपावलीनिमित्त तटकरे परिवाराचे इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं विशेष सत्कार करण्यात आला यामध्ये केवळ आणि केवळ सोलापूरचे नाव लौकिक होणे ह्याला आम्ही प्राधान्य दिला असे मत यावेळी राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव यांनी सांगितले.