crimepoliticalsocialsolapur

दुष्कर्माचा खटला तडजोडीने रद्द करता येतो: कोल्हापूर उच्च न्यायालय…

सोलापूर

 

सोलापूर येथील युवतीवर दुष्कर्म केल्याप्रकरणी अमोल ज्ञानदेव जाधव रा औरंगपूर ता राजुरी जिल्हा बीड याच्यावर असलेली दाखल फिर्याद कोल्हापूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम एस कर्णिक व शर्मिला देशमुख यांनी रद्दबादल केली.
या हकीकत अशी की पीडिता व आरोपी अमोल हे नातेवाईक होते व त्यांचे लग्न जमले होते परंतु काही दिवसांनी त्यांचे लग्न मोडले. त्यानंतर दोघे फोनवर बोलत होते. आरोपी अमोल हा मी तुझ्याशीच लग्न करणार असे म्हणत होता, दिनांक 10/11/2024 रोजी अमोल हा सोलापूरला आला व त्याने पिडीतेस बोलावून घेऊन तिस हॉटेलमध्ये नेऊन तिचेवरती दुष्कर्म केले. त्यानंतर अमोल याने पीडितेस फोन करून वाढदिवसासाठी बीड येथे बोलावले.

 

दिनांक 16/11/2024 रोजी पीडितता ही बीड येथे आली असता अमोल याने लग्नाची अमिष दाखवून तिचेवर दुष्कर्म केले. पीडिता ही अमोल यास लग्नाबाबत विचारत असता, तो थोडे थांब असे म्हणत असायचा. दिनांक 21/12/2024 रोजी अमोल याने तिचे घरी येऊन शिवीगाळ करून तिचे वडिलांस जीवे मारण्याची धमकी दिली. अशा आशयाची फिर्याद पिडीतेने दि- 27/12/2024 रोजी सलगर वस्ती पोलीस ठाण्यात दिली होती.

 

 

त्यावर आरोपी अमोल जाधव याने ऍड रितेश थोबडे यांचेमार्फत कोल्हापूर उच्च न्यायालयात त्याच्या विरुद्ध दाखल असलेली दुष्कर्माची फिर्याद रद्द होणे बाबत याचिका दाखल केली होती.

याचिकेच्या सुनावणी वेळेस यातील पिडीतेस खटला पुढे चालविण्याचा नाही, तिने दाखल केलेली फिर्याद रद्द करण्यास तिची हरकत नाही हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्या पृष्ठार्थ सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे सादर केले त्यावरून न्यायमूर्तींनी आरोपी विरुद्ध दाखल असलेली फिर्याद रद्दबातल केली.

यात आरोपी तर्फे ऍड रितेश थोबडे यांनी तर सरकारतर्फे ऍड वीर शिंदे यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button