crimemaharashtrapoliticalsocialsolapur

उताऱ्यावरील नाव कमी करण्यास टाळाटाळ ; संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी…

 

सोलापूर :

दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग येथील शेती उतारा गट क्रमांक एक/ दोन वरील अपक नोंद सर्व कागदपत्रे देऊनही कमी होत नाही. संबंधित अधिकारी टाळाटाळ करीत आहेत असा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे, अशी माहिती शेतकरी संगप्पा बडूरे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

 

 

मंद्रूप अप्पर तहसीलदार कार्यालयामध्ये या संदर्भात दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी उताऱ्यावरील अपक नाव कमी करण्यासाठी अर्ज दिला होता. दरम्यान पुन्हा अर्ज सादर केला. तरीही कार्यवाही होत नसल्याने मंद्रूपचे अप्पर तहसीलदार यांची भेट घेऊन विनंती केली. मात्र आठ महिने झाले तरी अद्याप याप्रकरणी कार्यवाही झाली नाही टाळाटाळ केली जात आहे.कुणाकडेही जा, मंत्र्यांकडे गेला तरी काम होणार नाही, अशी तंबी संबंधित अधिकारी देत असल्याचा आरोप संगप्पा बडूरे यांनी केला आहे.

 

याप्रकरणी तत्काळ न्याय द्यावा आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button