crimemaharashtrapoliticalsocialsolapur

जबरी चोरी करणारे आरोपी अटकेत त्यांच्याकडुन सोन्याचे मंगळसुत्र हस्तगत सोलापुर शहर गुन्हे शाखेची कामगिरी…

दिनांक 02/08/2025 रोजी सायकाळी 06.30 वा चे सुमारास फिर्यादी नामे-इंदुबाई तानाजी कांबळे रा. विष्णुमिल चाळ, डोणगांव रोड, सोलापुर व त्यांचा भाचा असे दोघेजण मोटार सायकल वरुन विष्णुमिल चाळीकडे येत असताना, नागोबा मंदिर जवळ, दोन इसमानी मोटार सायकलवरुन येवुन फिर्यादी यांना सेटलमेंटकडे जाणाग गेड कोणता आहे असे विचारुन, फिर्यादी यांच्या गळयातील सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसका मारुन ओढुन घेवून गेले. सदर बाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सलगरवस्ती पोलीस ठाणे, सोलापुर शहर येथे गुन्हा गंज. नं.205/2025, भा.न्या.सं.क.309 (4), 3(5) प्रमाणे दि.03/08/2025 रोजी गुन्हा दाखल आहे.

 

 

सदर गुन्हयाचे अनुषंगाने गुन्हे शाखे कडील सपोनि/विजय पाटील, सपोनि/दत्तात्रय काळे व त्यांचे पथक यांना खात्रीशिर बातमी मिळाली की, दोन इसम हे होटगी रोडवरील तुळजाई लॉन्स जवळ, मोकळया मैदानात, सोलापुर येथे संशयितरित्या थांबले असल्याची बातमी मिळाली. सदर बातमीची शहानिशा करुन कारवाई करणेकामी सदर टिकाणी जावुन इसम नामे 1) आदित्य रमेश कोणदे, वय-19 वर्ष, रा.377 हत्तुरे वस्ती, सोलापुर, 2) पृथ्वीराज श्रीशैल पुजारी, वय 19 वर्ष, रा.65, सैफुल, सोलापुर यांच्याकडे गुन्हयातील जबरदस्तीने हिसका मारुन घेतलेले सोन्याचे गंठण व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल सह ताब्यात घेवुन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी वरील प्रमाणे दाखल गुन्हा केल्याची कबूली दिली. त्यानुसार सलगरवस्ती पोलीस ठाणे, सोलापुर शहर गुन्हा राज. नं.205/2025, भा.न्या.सं.क.309(4), 3(5) प्रमाणे दाखल गुन्हयातील 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल असा एकुण 2,00,000/- किमतीचा मुददेमाल जप्त केला आहे.

 

 

सदरची कामगिरी मा. एम. राजकुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, डॉ. अश्विनी पाटील, पोलीस उप-आयुक्त गुन्हे, श्री. राजन माने, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली, सपोनि/विजय पाटील, सपोनि दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार जावेद जमादार, महेश शिंदे, अजिक्य माने, राजू मुदगल, धिरज सातपुते, आबाजी सावळे, कुमार शेळके, महेश पाटील, विठठल यलमार व सायबर पोलीस ढाणेकडील प्रकाश गायकवाड व मच्छिद्र राठोड, चालक काटे व काळे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button