महूद येथील सुनील कांबळे खून खटला:युवकास मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मंजूर….

सोलापूर
– सुनील अनिल कांबळे वय 32 रा महूद ता सांगोला जिल्हा सोलापूर याचा खून केल्याप्रकरणी योगेश मधुकर काटे वय 23, रा महूद ता सांगोला जिल्हा सोलापूर यांस मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री शिवकुमार दिघे यांनी जामीन मंजूर केला.
यात हकीकत अशी की, दि 11/7/2024 रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास दत्तात्रय लोखंडे याने ओंकार पंडित यास मारहाण केली होती. त्यावेळी ओंकार याने त्याचा मित्र आरोपी ऋषिकेश शिरतोडे यास मारहाणीची घटना सांगितली होती त्याबाबत आरोपी ऋषिकेश शिरतोडे व अनिल चव्हाण याने गणेश लोखंडे यास ओंकार याला मारहाणीबाबतचा जाब विचारला त्यावेळी त्यांचे बाचाबाची झाली होती. त्यानंतर रात्री 10:00 वाजेच्या सुमारास ऋषिकेश शिरतोडे व अनिल चव्हाण हे महूद येथील समाज मंदिराकडे येऊन नागेश लोखंडे आणि सुनील कांबळे या दोघांना झालेल्या भांडणाचा राग मनात धरून तुम्हाला बघून घेतो, सोडत नाही असे म्हणून निघून गेले. त्यानंतर रात्री 10:15 वाजेच्या सुमारास ऋषिकेश शिरतोडे व इतर आरोपी हे धारदार हत्यारे घेऊन झालेल्या भांडणाचा राग मनात धरून सुनील कांबळे यांच्या डोक्यात मानेवर गंभीरवार करून त्यास जीवे ठार मारले. त्यानंतर ते सर्वजण योगेश काटे यांच्या गाडीवर बसून पळून गेले. घटनेबाबत निशा कांबळे हिने सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावर योगेश काटे यास अटक झाली होती.
आपणास जामीन मिळावा म्हणून योगेश काटे याने पंढरपूर सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता
त्यावर योगेश याने ऍड रितेश थोबडे यांचेमार्फत मुंबई उच्च न्यायालयात जामीन मिळणेसाठी अर्ज दाखल केला होता.
अर्जाच्या सुनावणीच्या वेळी ऍड रितेश थोबडे यांनी आपले युक्तीवादात, गुन्ह्यातील दोषारोप पत्रकाचे अवलोकन केले असता, अर्जदार आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा निष्पन्न होत नसल्याचा युक्तिवाद मांडला त्यावरून न्यायमूर्तींनी 30,000/- रुपयाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
*यात अर्जदार आरोपीतर्फे ऍड रितेश थोबडे यांनी तर सरकार तर्फे ऍड अशोक मेटकरी यांनी काम पाहिले.