सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील पोलीस उपअधीक्षक, दीपक चव्हाण, व सपोनि बाळासाहेब जाधव यांना राष्ट्रपती पदक प्रदान…

भारत देशातील सुरक्षा दलामध्ये काम करणारे अधिकारी व अंमलदार यांना त्यांच्या सेवा कालावधीत केलेल्या चांगले व उल्लेखनिय कार्याबद्दल भारत देशाचे महामहीम राष्ट्रपती, भारत यांचेकडून वेगवेगळे पदक देवून सन्मानीत करण्यात येते, दिनांक २६ जानेवारी २०२३ रोजीच्या पूर्वसंध्येला सोलापूर ग्रामीण दलामध्ये कार्यरत असलेले १) श्री. दीपक चव्हाण, पोलीस उपअधीक्षक, आधिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण २) श्री. बाळासाहेब जाधव, सहायक पोलीस निरीक्षक, वाशी शहर पोलीस ठाणे यांना अनुक्रमे “गुणवत्तापूर्ण सेवाकरीता राष्ट्रपतींचे पोलीस पदक” व “शोर्य पदक” जाहीर करण्यात आले होते.
या जाहीर झालेल्या राष्ट्रपती पदकांचा अलंकारण सोहळा दिनांक २९/०७/२०२५ रोजी राजभवन मुंबई येथे पार पडला असून त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल श्री. सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते दीपक चव्हाण व बाळासाहेब जाधव यांना राष्ट्रपती पदक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.
वातील श्री. दिपक चव्हाण, पोलीस उपअधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण हे सन १९९५ मध्ये पोलीस दलामध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्त झाले होते, त्यांनी यापूची मुंबई पोलीस दलातील गुन्हे शाखा, माटुंचा पोलीस ठाणे येथे यशस्वी कर्तव्य चजावले आहे. माहे सप्टेंबर २०२४ मध्ये त्यांना पोलीस उपअधीक्षक पदावर पदोन्नती मिळाल्याने ते पदोन्नतीवर आधीक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण येथे हजर झाले होते. त्यांनी सोलापूर ग्रामीण दलात आर्थिक गुन्हे शाखेकडोल विविध गुंतागुंतीच्या गुन्ह्याचा तपास केला आहे. त्यांना त्यांच्या ३० वर्षे सेवेसाठी “गुणवत्तापूर्ण सेवाकरीता राष्ट्रपतींचे पोलीस पदक” पदान केले आहे.
तसेच श्री. बाळासाहेब जाधव, सहायक पोलीस निरीक्षक, बाशी शहर पोलीस ठाणे हे देखील पोलीस दलामध्ये सन २०१४ मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्त झाले आहेत, त्यांनी जालना जिल्ह्यात परतूर पोलीस ठाणे येथे कर्तव्य केले होते, त्यानंतर त्यांनी २०२० ते जुलै २०२४ या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात सी ६० पथकामध्ये काम केले. यामध्ये एटापल्ली तालुक्यात गर्दत्वाड पोलीस ठाणे येथे काम करत असताना २९ मार्च २०२१ रोजी नक्षलवादी यांचेशी झालेल्या चकमकीत ५ नक्षलवाद्यांना ठार केले होते तसेच दिनांक १३ नॉव्हेंबर २०२१ रोजी झालेल्या चकमकीमध्ये २७ नक्षलवादी यांना ठार केले होते, अशा प्रकारे गडचिरोली येथील सेवा कालावधीत ३२ नक्षलवादी यांना चकमकीत ठार केल्याच्या कामाची दखल घेवून त्यांना महामहीम राष्ट्रपती भारत सरकार यांचेकडून “शीर्य पदक” प्रदान केले आहे.
मा.श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण व मा.श्री. प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी राष्ट्रपती पदक प्राप्त अधिकारी श्री. दीपक चव्हाण, पोलीस उपअधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण व श्री. बाळासाहेच जाधव, सहायक पोलीस निरीक्षक, बाशी शहर पोलीस ठाणे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.