पुरातन खात्याच्या नोटीसीला केराची टोपली : अनिरुद्ध देशपांडे….

सोलापूर :
सोलापुरातील नामवंत शैक्षणिक संस्था सरस्वती मंदीर प्रशाला हि हेरिटेज वास्तु भुईकोट किल्ला 300 वर्षापेक्षा जास्त काळापासून पुरातन, ऐतीहासीक कलात्मक महत्व असलेला भुईकोट किल्ला अस्तित्वात असून किल्याच्या अतिशय जवळ असलेली शैक्षणिक संस्था. किल्ल्याच्या बाजुस १०० ते २०० मीटरचे परिसरास केंद्र सरकारच्या पुरातन खात्याने प्रोहिबिटेड एरिया जाहीर केला असून अर्थात सरस्वती मंदीर प्रशाला किल्याच्या नजीक अंन्तर 66.16 मिटर अंतरावर व किल्याच्या सिमेपासून केवळ 32 मिटर अंतरावर असून सदर सरस्वती मंदीर संस्थेस प्राचिन स्मारके, आणि पुरातत्त्व स्थळे, आणि अवशेष कायदा १९५८ तसेच पुरातत्व कायदा अधिनयम २०१० द्वारे हे कायदे लागू आहेत. त्यामुळे कायद्यानुसार केंन्द्र सरकारच्या पुरातत्व खात्याची आत्यावशक पणे पुर्व परवानगी घेतल्या शिवाय त्या प्रोव्हिबिटेड ओरिया मधील कोणतेही बांधकाम करणे, जुन्या बिल्डिंग ची दुरुस्ती, नुतनीकरण, खोदकाम, गिलावा, बदल, अथवा इमारतीचे कोणतेही काम करण्यास पुरातत्त्व कायदा अधिनियम २०१० नुसार बंन्दी असून,तसे केल्यास तो दखलपात्र गुन्हा असून, पुरातत्व विभागाने सरस्वती मंदिर संस्थेस बेकायदेशीर पणे खोदकाम करून बांधकाम केले या संदर्भात अधिकृत पणे नोटिस दिनांक २७/४/२०२२ पाठवून हे बांधकाम सातदिवसात पाडावे अशी नोटिस दिली. त्यानंतर १८/७/२०२२ रोजी पुन्हा एक नोटीस बजावण्यात आली.

त्यानुसार हे बांधकाम बेकायदेशीर व अनाधिकृत असल्याचे पुरातत्व विभागाने ठरविले. ह्या बांधकामास संस्थेचे तत्कालीन पदाधिकारी ॲड रघूनाथ दामले, ॲड पांडूरंग देशमुख, किरण करकमकर, शिरीष तुळजापुरकर, ह्यांना जबाबदार ठरविण्यात आले.
याचिकाकर्ते श्री अनिरुद्ध देशपांडे हे सोलापुरातील पुरातत्व विभागाचे
संरश्रीक्षण सहाय्यक अधिकारी मंडावरे साहेबांना गेली तीन वर्षे सतत सातत्याने पाठपुरावा करून याबाबत लेखी तक्रार करीत होते.नेहमी प्रमाणे ते कोणतेही उत्तरे
देत नव्हते,केवळ त्यांना सरस्वतीच्या माध्यमातून लक्ष्मीदर्शन घडले असावे असे अधिकृत सुत्रानुसार समजते त्यामुळे त्यांनी तक्रारदाराच्या सर्व तक्रारीला केराची टोपली दाखवली. पुरातत्त्व विभागाने याआधी अनेकांवरती असे बांधकाम केल्याबाबत गुन्हे दाखल केलेले आहेत.

संस्थेला दिलेल्या केंन्द्र सरकारच्या पुरातत्त्व खात्याच्या नोटिसीला सुद्धा संस्थेने केराची टोपली दाखवत हम भी कुछ कम नही,त्यामुळे सोलापुरातील पुरातत्व खात्याचा कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली असून जवळपास अनेक विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ हे पुरातत्व खाते खेळत असून शिक्षण क्षेत्रात श्री मंडावरे यांचे बाबत संशयास्पद वातावरण निर्माण झाले असून याबाबत श्री मंडावरे काय भूमीका घेतात या कडे सर्वाचे लक्ष लागले आहे.



