राष्ट्रवादी सहकार सेलच्या सोलापूर शहर अध्यक्षपदी भास्कर आडकी …
महाराष्ट्र प्रदेश सहकार सेल प्रदेश कार्याध्यक्ष राजेंद्र हजारे यांच्या शुभहस्ते नियुक्तीपत्र प्रधान...

सोलापूर
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या शिफारशीवरून सहकार सेल प्रदेशाध्यक्ष …मोरे तसेच कार्याध्यक्ष राजेंद्र हजारे यांनी शहर उपाध्यक्ष भास्कर आडकी यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर सहकार सेलच्या शहर अध्यक्ष पदी नियुक्ती केली. सहकार सेल महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष राजेंद्र हजारे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहचवून पक्ष संघटन मजबूत कराल अशी आशा व्यक्त करीत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या याप्रसंगी परिवहन सभापती आनंद मुस्तारे महीला अध्यक्ष संगीताताई जोगदनकर सरचिटणीस शामराव गांगर्डे आदि उपस्थित होते