लाल आखाडा तालीमच्या पठ्याचा आमदार विजयकुमार देशमुख यांनी केला विशेष सत्कार…
छत्रपती केसरी पुरस्कार पटकावल्याने पैलवान पृथ्वीराज सरवदे यांचा कोल्हापुरात सन्मान...

सोलापूर
कोल्हापूर जिल्ह्यातील कनोळी गाव येथे भव्य कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत राज्यातील विविध पैलवानांनी विशेषतः सहभाग नोंदवला होता.सोलापूरचा सुपुत्र आणि लाल आखाडा तालीम संघाचा पठ्या पैलवान पृथ्वीराज सरवदे यांनी सोलापूरचे नावलौकिक करत मानाचा छत्रपती केसरी पुरस्कार पटकाविला .त्यांच्या या यशाबद्दल सोलापूरकरांनी पैलवान पृथ्वीराज सरवदे यांचे विशेष कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
आमदार विजयकुमार देशमुख यांनी छत्रपती केसरी पुरस्कार प्राप्त पैलवान पृथ्वीराज सरवदे यांचा पक्ष कार्यालयात पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान केला.

व पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या सत्कार सोहळ्या प्रसंगी विजय दोरकर, किसन सरवदे, अमोल झाडगे, रमेश गायकवाड, आकाश भोसले, धीरज सरवदे, रविराज सरवदे, सूर्यकांत भोसले आदी उपस्थित होते.



