बेकायदा बांधकाम परवानगी प्रकरणी महापालिका बांधकाम अभियंत्यांना जामीन मंजूर:- ॲड. शशी कुलकर्णी…

सोलापूर महानगरपालिका सोलापूर येथील तत्कालीन सहाय्यक बांधकाम अभियंता श्री झकिरहुसेन नाईकवाडी व कनिष्ठ अभियंता श्री श्रीकांत खानापुरे या दोघांना महापालिकेमध्ये कार्यरत असताना बेकायदेशीर बांधकाम परवाने देऊन, महापालिकेचे नुकसान केल्याचे प्रकरणात सत्र न्मायालयाने जामीन मंजूर केला
यात हकीकत अशी की, जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत सोलापूर महानगरपलिका बांधकाम परवाना विभाग येथे श्री झाकिरहुसेन नाईकवाडी (सहायक अभियंता) व श्री श्रीकांत खानापुरे (कनिष्ठ अभियंता) इतर दोघे कर्मचारी यांनी संगनमताने महापालिकेची व मिळकतदाराची जाणीवपूर्वक त्यांचे फायद्यासाठी फसवणूक केलेली आहे व जे बांधकामाचे नकाशे मंजूर करण्याचे अधिकार त्यांना नाहीत हे माहीत असूनही त्यांनी ते मंजूर केल्पाचे कागदपत्रे तयार करून मिळकतदाराची व महानगरपालिकेची फसवणूक केलेली आहे व खोटे व बनावट बांधकाम परवाने त्यांना दिले आहेत तसेच सदर बांधकाम परवाने मंजूर केल्पा बाबतचे आवक रजिस्ट्र व नमूद अनधिकृत बांधकाम परवाना क्र ०१ते ९६ संदर्भात मंजूर करण्यात आलेल्या संदर्भाने सर्व दस्म हे जाणीवपूर्वक नाश अथवा त्माची विल्हेवाट अथवा ते कोठेतरी स्थलांतरित केले व महापालिकेकडे केवळ कमी विकास शुल्क जमा करण्यास लावून महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान केले आहे म्हणून महापालिका उपअभियंताश्री मठपती यांनी वरील मजकुराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर यातील वरील दोघे अभियांता त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळल्या नंतर दि. १८/२/२०२५ रोजी पोलिसांसमोर हजर झाले.
त्मानंतर तपास होऊन पोलिसांनी अंतिम आरोपपत्र कोर्टात दाखल केले. त्यानंतर आरोपींनी दुसऱ्यांदा जामीन अर्ज दाखल केला होता. त्याची सुनावणी होऊन, त्यामध्ये आरोपीचे वकील अॅड. शशी कुलकर्णी यांनी असा युक्तिवाद केला की, तपास पूर्ण झाला आहे, तपासात काहीही निष्पन्न होत नाही आरोपी स्वतःहून हजर झाले आहेत, आरोपीस जेलमध्ये ठेवण्याचे कोणतेही संयुक्तिक कारण सरकारपक्षाकडे नाही, आरोपी हे निवृत्त व आजारी असल्याने आरोपींना जामिनावर मुक्त करणे गरजेचे आहे, असा युक्तिवाद करून सर्वोच्च न्मायालयाचे काही निवाडे सादर केले सरकार पक्षानेही गुन्हा गंभीर असल्याचे कारण देत हरकत घेतली तथापि आरोपींचे वकिलांचा युक्तिवाद विचारात घेऊन मळा. सत्र न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला.
यात आरोपीतर्फे अॅड शशी कुलकर्णी, अॅड देवदत्त बोरगावकर, अॅड स्मृप्निल सरवदे, अॅड प्रसाद अग्निहोत्री, अॅड प्रणव उपाध्ये, अॅड आदित्य आदोने तर सरकारपक्षातर्फे अॅड दत्ता पवार यांनी काम पाहिले….