मतदारांना लाच दिल्याप्रकरणी माजी महापौर मनोहर सपाटे यांचेसह। जणांची निर्दोष मुक्तता….अॅड. प्रशांत नवगिरे

सोलापूर- येथील 1) मनोहर सपाटे वय 60 वर्षे, धंदा व्यापार रा. दमाणी नगर, सोलापूर 2) ज्ञानेश्वर सपाटे वय-40 वर्षे, धंदा व्यापार रा. मुरारजी पेठ, सोलापूर, 3) कृष्णांत शिंदे वय-25 वर्षे, धंदा ड्राइव्हर रा. कासेगाव, सोलापूर 4) जगदीश भोसले वय-41 वर्षे, धंदा- शेती रा. मुरारजी पेठ, सोलापूर, 5) दत्तात्रय गायकवाड वय-40 वर्षे, धंदा-व्यापार रा. अभिमानश्री नगर, सोलापूर 6) उमाकांत निकम वय 60 वर्षे, धंदा- व्यापार रा. देगाव रोड, सोलापूर यांनी सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2012 दरम्यान मतदारसंघातील मतदारांना मतदान करण्याकरिता एक हजार रुपये व घड्याळ देण्याचे आमिष दाखविल्याचे गुन्ह्याकामी त्यांची मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती राघिणी जंगम साहेब यांनी निर्दोष मुक्तता केली.
यात हकीकत अशी की, सन 2012 मध्ये सोलापूर महानगरपालिका अंतर्गत सार्वत्रिक निवडणूक जाहीर करण्यात आली होती, त्यावेळी मनोहर सपाटे हे प्रभाग क्रमांक 11 मध्ये राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत होते, सदर वेळी आवसे वस्ती येथे मनोहर सपाटे व त्यांचे कार्यकर्ते तेथील लोकांना एक हजार रुपये व त्यांच्या पक्षाचे चिन्ह असलेले घड्याळ वाटप करत असल्याचा फोन शशिकांत साठे यांनी पोलिस नियंत्रण कक्षास केला, त्याप्रमाणे पोलिसांनी सदर ठिकाणी भेट दिली असता त्या ठिकाणी टाटा इंडिगो या गाडीमध्ये एका बॉक्समध्ये लेडीज मनगटी घड्याळ मिळून आले, अशा आशयाची फिर्यादी पोलीस निरीक्षक आप्पासाहेब शिवाजी पवार यांनी माजी महापौर मनोहर सपाटे व इतर पाच जणांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे दिली. सदर गुन्ह्याचा तपास होऊन न्यायालयात वर नमुद आरोपींविरुद्ध दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. सदर खटल्याची सुनावणी श्रीमती रागिणी जंगम साहेब यांचे कोर्टात झाली. सदरकामी सरकार पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. आरोपींतर्फे अॅड. प्रशांत नवगिरे व अॅड. सागर पवार यांनी हजर होऊन आरोपींची बाजू मांडली व साक्षीदारांचे साक्षीतील विसंगती मे. कोर्टाचे निदर्शनास आणून दिली व असा युक्तिवाद करण्यात आला की, “राजकीय विरोधकांनी खोटा गुन्हा दाखल केला, गुन्ह्याकामी जप्त घड्याळे व वाहन यांचा आरोपींशी संबंध नाही, सरकार पक्षाने खटला पुराव्यानिशी शाबित केला नाही” सदरचा युक्तिवाद ऐकून व ग्राह्य धरून सबळ पुराव्याअभावी वर नमूद आरोपींची मा. न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
यात आरोपींतर्फे अॅड. प्रशांत नवगिरे, अॅड. सागर पवार, अॅड. श्रीपाद देशक, अॅड. सिद्धाराम पाटील यांनी काम पाहिले.