सोलापूर जिल्हा नागरी सह. बँक्स असोसिएशन यांच्यातर्फे मनोरमा बँकेस आदर्श बँकेचा प्रथम पुरस्कार प्रदान…

सोलापूर :
सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स को ऑप. असोसिएशनच्या वतीने रविवारी (ता. 9) सकाळी सोलापूरातील मनोरमा बँकेस आदर्श बँकेचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला .
सोलापूर जिल्ह्यातील 500 कोटीवरील नागरी सहकारी बँकांमधून सन 2021 ते 2024 च्या आर्थिक व गुणवत्ता श्रेणीनुसार मनोरमा बँकेस आदर्श बँक प्रथम पुरस्कार मिळाला.
मनोरमा बँकेने मार्च 2024 अखेर 1003 कोटी व्यवसायचा टप्पा पार केला असून सतत 6 वर्ष 0% NPA कायम राखला असून 9 नऊ शाखा सह कार्यरत आहे.
पुरस्कार मिळाल्यानंतर बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे यांनी बँकेच्या यशाचे गमक सांगितले. मनोरमा बँकेस रिझर्व बँक ऑफ इंडियाकडून FSWM हा दर्जा प्राप्त झाल्यामुळे या बँकेची वाटचाल अत्यंत सक्षमपणे सुरू आहे.
FSWM या निकषामुळे दरवर्षी 2 ते 3 शाखा काढण्याचे मानस असून ग्राहकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणारी बँक आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उस्मानाबाद बँकेच्या प्रशासकाचा सखोल अनुभव असल्यामुळे हे शक्य होते.
यावेळी बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे, मनोरमा परिवाराच्या मार्गदर्शिका सौ. शोभा मोरे, व्हा. चेअरमन संतोष सुरवसे, कार्याध्यक्षा सौ. अस्मिता गायकवाड, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष अॅड. सुरेश गायकवाड, संचालक दामोदर देशमुख, डॉ. ऋचा मोरे – पाटील, सौ अश्विनी दोशी, कविता कुलकर्णी, गजेंद्र साळुंखे, गणपत कदम, संतोष मोटे, सुहास भोसले, प्रा. डॉ. बब्रुवाहन रोंगे, दत्तात्रय मुळे, प्रशांत शहापूरकर, विकास सक्री, बँकेच्या सीईओ शिल्पा कुलकर्णी (मोहिते), यावेळी बँकेचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.
हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा