ओंकार ज्वेलर्सचे दुकान फोडून लाखोंचा ऐवज लंपास करणाऱ्या चोरट्यांच्या शहर गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या…

सोलापूर
दिनांक ९/०६/२०२५ रोजी , सोलापूर शहरातील भवानी पेठ येथील ओंकार ज्वेलर्सचे दुकानाचे शटरचे कुलूप तोडून, आत प्रवेश करून दुकानातील चोरीचे सोन्या – चांदीचे दागिने चोरून नेल्याची फिर्याद तक्रारदार अज्ञात चोरट्या विरुद्ध दाखल केली होती.
त्या तक्रारी नुसार अज्ञात चोरट्या विरुद्ध जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३३१(१),३३१(४),३०५ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील,पोलिस उप निरीक्षक मुकेश यांना व त्यांच्या पथकास गुन्ह्याच्या अनुषंगाने गोपनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन अज्ञात चोरटे हे चोरीचे सोन्या – चांदीचे दागिने घेऊन ०२ नंबर बस स्टँड शास्त्री नगर सोलापूर येथे थांबले असल्याची बातमी मिळाली. प्राप्त बातमीची शहानिशा करून कारवाई करण्यासाठी तत्काळ ०२ नंबर बस स्टँड शास्त्री नगर सोलापूर येथे जाऊन आरोपी नाव सिद्धनाथ उर्फ ढेप्या गंगाधर बंडगर वय २१ वर्षे भवानी पेठ सोलापूर व एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना चोरलेल्या सोने – चांदीच्या दागिन्यासह ताब्यात घेतले .त्या नंतर त्यांच्या कडे गुन्ह्याच्या अनुषंगाने अल्पवयीन बालकाचे नातेवाईक यांच्या समक्ष अधिक चौकशी केली असता त्यांनी भवानी पेठेतील गुन्ह्याची कबुली दिली .
त्यानुसार त्यांच्यावर ३३१(१),३३१(४),३०५ अनव्ये दाखल गुन्ह्यातील १२२० ग्रॅम चांदीच्या वस्तू व ३ ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूणच १,७२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या आदेशान्वये पोलिस उपायुक्त शहर गुन्हे शाखा दीपाली काळे , सहाय्यक पोलिस आयुक्त राजन माने , गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील , पोलिस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड, व पोलिस अंमलदार सहाय्यक फौजदार नंदराम गायकवाड , ,वाजिद पटेल,योगेश बर्डे , राहुल तोगे , आबाजी साबळे , संजय साळुंखे , अजिंक्य माने ,धीरज सातपुते , विठ्ठल यलमार,महिला पोलिस हवालदार शिलावती काळे ,वाहन चालक सतीश काटे यांनी या कारवाईसाठी अथक परिश्रम घेतले….