छत्रपती शिवाजी महाराजांना शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राष्ट्रवादीकडून अभिवादन…

सोलापूर.
महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जीवनातील गौरवशाली अशा या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या शुभहस्ते युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले .
छत्रपती शिवराय हे दूरदृष्टीचे, अद्वितीय राजे होते. महाराजांनी दाखवलेल्या वाटेवरतीच महाराष्ट्राची वाटचाल अखंड सुरू राहील. त्यांच्या आदर्श राज्य कारभाराखाली सर्वसामान्य रयतेचं राज्य, शेतकऱ्यांचं स्वराज्य महाराष्ट्राच्या ह्या भूमीत विधीपूर्वक स्थापन झालं, ही आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. महाराजांच्या धैर्य, शौर्य, त्याग, पराक्रम तसंच त्यांच्या कार्याला राष्ट्रवादीच्या वतीने नम्रपणे वंदन करण्यात आले …
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद दादा भोसले, ज्येष्ठ नेते हेमंत दादा चौधरी, माझी परिवहन सभापती आनंद मुस्तारे, माजी नगरसेवक प्रा. श्रीनिवास कोंडी जेष्ठ नेते महेश निकंबे महीला कार्याध्यक्ष चित्राताई कदम अल्पसंख्यांक राष्ट्रीय सचिव फारूक मटके सांस्कृतिक विभाग आशुतोष नाटकर, अल्पसंख्यांक अध्यक्ष अमीर भाई शेख ओबीसी अध्यक्ष अनिल छत्रबंद,वाहतूक सेलचे अध्यक्ष. इरफान शेख, सहकार सेल अध्यक्ष. भास्कर अडकी, मध्य विधानसभा अध्यक्ष. अलमेराज आबादीराजे, सोशल मीडिया अध्यक्ष वैभव गंगणे सुजित भाऊअवघडे, दत्ता भाऊ, बनसोडे, मनोज शेरला, सहसचिव ईशांत तारा नाईक, श्रीकांत वाघमारे, प्रज्ञासागर गायकवाड, मोईज मुल्ला, महिला कार्याध्यक्ष. चित्राताई कदम शामराव गांगर्डे आदी पदाधिकारी उपस्थित होते