india- worldmaharashtrapoliticalsocial
मुंबई येथे मध्य रेल्वे बैठकीत सोलापूर पुणे हुतात्मा एक्सप्रेस हडपसर येथे थांबा देण्याची गणेश डोंगरे यांची मागणी…

मुंबई- 126 वी क्षेत्रीय रेल उपयोगकर्ता परामशदात्री समिती मुंबई, बैठक मध्य रेल्वे महाप्रबंधक (GM) धर्मवीर मीना यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
*मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य (ZRUCC) गणेश डोंगरे यांनी बैठकीत सोलापूर-पुणे हुतात्मा एक्सप्रेस सकाळी 6.30 वाजता सोलापूरहून पुणेला जाते. रोज सोलापुरातून युवक, महिला कामासाठी पुण्यात ये जा करतात. हडपसर भागात आयटी कंपनी मोठया प्रमाणात आहे.गाडी हडपसर ला न थांबता पुणेला जाते.
पुणे रेल्वे स्टेशन वरून हडपसर ला कंपनीला कामाला जाताना ट्रॉपिक मुळे दोन तास जातात. त्या मुळे प्रवासांचे खूप हाल होत आहे. तसेच हडपसर रेल्वे स्टेशन वर पन्नास टक्के प्रवासी उतरतात. सोलापूरातील प्रवासांचे हित लक्ष्यात घेता हडपसर ला थांबा मिळवा मागणी केली. या वर रेल्वे प्रशासननी सकारात्मक उत्तर दिले.