एनटीपीसीच्या सामाजिक जबाबदारी आणि महिलांच्या सबलीकरणासाठी असलेल्या वचनबद्धतेचे पालिका आयुक्त ओंबासे यांच्या कडून विशेष कौतुक….

सोलापूर महानगर पालिका आयुक्तांची NTPC येथे आयोजित GEM -2025 कार्यशाळेला भेट...
प्रतिनिधी/सोलापूर
NTPC येथे 24 मे रोजी सीएसआर उपक्रमा अंतर्गत ‘गर्ल एम्पॉवरमेंट मिशन (GEM) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर महानगर पालिका आयुक्त ओंबासे हे होते .सुरुवातीस NTPC चे प्रकल्प संचालक बी.जे .शास्त्री यांनी पालिका आयुक्त ओंबासे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागतपर सत्कार केला. यावेळी प्रास्ताविकात NTPC चे प्रकल्प संचालक बी.जे .शास्त्री यांनी GEM कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना हा कार्यक्रम चार आठवड्याचा आयोजित करण्यात आल्याचे सांगत वंचित पार्श्वभूमीतील मुलींच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करण्यात येत असल्याचे सांगितले.
यात जीवन कौशल्य प्रशिक्षण, शैक्षणिक प्रबोधन आणि व्यक्तिमत्व विकास यांचा विशेषतः भर देण्यात येणार असल्याचेही सांगितले .
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पालिका आयुक्त ओंबासे यांनी त्यांच्या भाषणात
एनटीपीसीच्या सामाजिक जबाबदारी आणि महिलांच्या सबलीकरणासाठी असलेल्या वचनबद्धतेचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे समताधिष्ठित समाज घडण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले. GEM मध्ये सहभागी झालेल्या मुलींना त्यांनी मोठे स्वप्न पाहण्याचे आणि त्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. “असे उपक्रम परिवर्तनशील असतात; ते आत्मविश्वास निर्माण करतात, महत्त्वाकांक्षा पेटवतात आणि भविष्याचे नेते घडवतात,” असे ते म्हणाले.
या भेटीत GEM मुलींनी कार्यक्रमामुळे त्यांच्या जीवनात झालेले सकारात्मक बदल सांगणारी मनोगते सादर केली. आयुक्तांच्या उपस्थितीने आणि प्रेरणादायी शब्दांनी सहभागी मुलींवर सखोल प्रभाव टाकला.
एनटीपीसी सोलापूर समावेशी प्रगती आणि सामाजिक समतेसाठी असे अर्थपूर्ण आणि प्रभावी सीएसआर उपक्रम राबविण्यास वचनबद्ध आहे. डॉ. ऑबसे यांच्या भेटीमुळे मुलींच्या सबलीकरणाच्या या प्रवासाला नवीन प्रेरणा मिळाली आहे.