सरकारी डॉक्टरांना मारहाण, आरोपीची निर्दोष मुक्तता: ॲड. शशी कुलकर्णी….

.
सोलापूर —
येथील भोजप्पा तांडा कवठे तालुका उत्तर सोलापूर येथील रहिवासी राहुल रतन राठोड वय 34 ,रतन गोविंद राठोड वय 63 या दोघांची प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरास शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकारणीच्या खटल्यात सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
यात हकीकत अशी की, दि. 6/6/2020 रोजी दुपारी तिरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. गोडसे, डॉ.कुलकर्णी हे इतर स्टाफसह कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या नातेवाईकांची कॉन्टॅक्ट ट्रेसिंग साठी भोजप्पा तांडा येथे गेले होते. त्यावेळी वरील दोघांनी त्यांच्या अंगावर जाऊन शिवीगाळ करून त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. अशा आशयाची फिर्याद डॉक्टर गोडसे यांनी सलगर वस्ती पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती. सदर प्रकरणी पोलिसानी तपास मे. कोर्टात दोषारोपपत्र पाठवले होते. सदर प्रकरणाची सुनावणी सत्र न्यायाधीश यांचे समोर झाली.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये आरोपीच्या वकिलांनी आरोपीची बाजू मांडताना बरीचशी महत्वाची कागदपत्रे कोर्टात दाखल केली. त्यामध्ये युक्तिवाद करताना कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले की, डॉक्टर विरोधात बऱ्याचशा तक्रारी होत्या त्या तक्रारी करण्यामागे आरोपीच आहेत असा गैरसमज डॉक्टरांना होता त्या रागातून डॉक्टरांनी आरोपीविरुद्ध खोटी केस केलेली आहे. आरोपी स्वतः व त्याचे नातेवाईक कोरोना बाधित नव्हते त्यामुळे त्यांना असे करण्याचे कोणतेही कारण नव्हते, घटनेचे स्वतंत्र साक्षीदार नाहीत सरकार पक्ष गुन्हा शाबित करू शकले नाहीत या सर्व मुद्द्याचा विचार घेऊन आरोपीची निर्दोष मुक्तता करावी असा युक्तिवाद आरोपीतर्फे ॲड.शशी कुलकर्णी यांनी केला सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून मे कोर्टाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
सदरकामी आरोपीतर्फे ॲड.शशी कुलकर्णी ॲड.गुरुदत्त बोरगावकर, ॲड. प्रसाद अग्निहोत्री, ॲड. आदित्य अदोने यांनी काम पाहिले तर सरकार पक्षातर्फे ॲड. आनंद कुर्डूकर यांनी काम पाहिले.
सेशन केस – 282/2022
कोर्ट – प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश.