महापालिकेने केला मुळेगाव कत्तलखाना रद्द; प्राणी मित्रांनी मानले मीडियाचे आभार….

सोलापूर प्रतिनिधी.
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने मुळेगाव येथे कत्तलखाना सुरू करण्याबाबत वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात देण्यात आली होती. सदर कत्तलखान्याच्या विरोधात प्राणी मित्रांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला. सर्व बाजूंनी कत्तलखान्याला विरोध होत असल्यामुळे काल शुक्रवारी महानगरपालिकेच्या वतीने कतलखाना रद्द करण्यात आला असल्यामुळे मा.मुंबई उच्चन्यायलय व महाराष्ट्र शासन गठीत , महाराष्ट्र राज्य प्राणी कल्याण कायदा सनियंत्रण समिती चे मानद पशु कल्याण अधिकारी महेश भंडारी व केतन शहा यांनी व इतर प्राणी प्रेमींनी सर्व मीडिया व कत्तलखान्याला विरोध करणाऱ्या नागरिकांचे आभार मानले आहेत.
महानगर पालिकेच्या डिसेंम्बर २००५ साली झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये ठराव क्र ४०६ व ४०८ झाला असताना पुन्हा मुळेगाव तांडा येथे यांत्रिक कत्तलखाना उभा करण्यासाठी बीओटी तत्त्वावर कत्तलखाना सुरू करण्याकरिता महापालिकेच्या वतीने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिराती विरोधात सर्व प्राणी मित्रांच्या ईमेल स्ट्राइकमुळे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी मुळेगाव येथील कत्तलखाना उभा करण्याचा विषय पूर्णतः स्थगित केलेला आहे.
हा कत्तलखाना रद्द करण्याबाबत शहरमध्येचे आमदार देवेंद्र कोठे यांनी मध्यस्थी करून आंदोलकांची भूमिका आयुक्तांना समजावून सांगितली त्यामुळेच हे यश प्राप्त झाले आहे अशी कृतज्ञता ही महेश भंडारी यांनी व्यक्त केली आहे.
याप्रसंगी ह भ प लक्ष्मण चव्हाण महाराज, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री संजय जमादार, जिल्हाध्यक्ष डोंगरे महाराज , हिंदू राष्ट्र सेनेचे रवी गोणे, आनंद मुसळे, अभय कुलथे, नागेश बंडी, शुभम साठे पुष्पाताई पाटील , रुद्रपा बिराजदार व इतर अनेक मान्यवर, कार्यकर्ते उपस्थित होते.