entertainmentmaharashtrapoliticalsocialsolapur

पुण्याचा संगवई पुरस्कार दत्ता भोसले यांना जाहीर…

सोलापूर दि,9 – काव्य मित्र संस्था, पुणेच्या वतीने देण्यात येणारा यंदांचा संजय संगवई स्मृती पुरस्कार येथील छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजचे ग्रंथालयीन कर्मचारी दत्ता भोसले यांना जाहीर झाला आहे.
जागतिक मातृदिन, छत्रपती संभाजी महाराज जयंती,तसेच कर्मवीर भाऊराव पाटील व समाजसेवक तथा विचारवंत संजय संगवई यांच्या स्मृतिदिनाचे
औचित्य साधून हा पुरस्कार देण्यात येत असूनया पुरस्काराचे यंदाचे हे २५वे वर्ष आहे.सन्मानचिन्ह,सन्मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

 

 

येत्या रविवारी, ११ मे रोजी सकाळी १०.३० वाजता पुण्यातील पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथील तारांगण ऑडिटोरिअम येथे या पुरस्काराचे वितरण मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील राजे लखोजी जाधवराव यांचे १४ वे वंशज तथा स्वराज्याचे सरसेनापती धनाजी जाधवराव यांचे थेट दहावे वंशज श्रीमंत संभाजीराजे जाधवराव यांच्या हस्ते होणार आहे.

 

 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी व साहित्यिक डॉ. सुरेश वाकचौरे हे राहणार असून याप्रसंगी भोसरी
येथीक श्रेयस टुल्स अँड कंपोनन्टसचे डॉ. अशोक साळुंखे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
भोसले यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संस्थेचे
अध्यक्ष तथा माजी महापौर मनोहर सपाटे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अरुण मित्रगोत्री, माजी प्राचार्य डॉ. अनिल बारबोले, डॉ. मधुकर पवार, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुजाता जुगदार, माजी ग्रंथपाल नागनाथ नवगिरे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button