मी तुझ्यासोबत लग्न करणार, अशी खोटी थाप मारून दुष्कर्म केल्याप्रकरणी तरुणावर दाखल केलेल्या ॲट्रॉसिटी प्रकरणातून उच्च न्यायालयातून अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर:- ऍड. रितेश थोबडे

सोलापूर
दि:- 2 जानेवारी २०२४ मध्ये पिडीतेची वाढपीच्या कामानिमित्त आरोपी दिनेश बाबुलाल कुमावत वय-३० वर्षे, रा. बुधले गल्ली, बाळेवेस, सोलापूर यांच्याशी ओळख झाली व फोनवर प्रेम आहे, मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे असे म्हणून हुतात्मा बगिचा सोलापूर व अक्कलकोट रोड मंदिरात फिरायला घेऊन जावून पिडीतासोबत प्रेमाच्या गोष्टी करीत होता. आरोपीने दि. २७/०३/२४ व दि.१४/०४/२४ रोजी बार्शी रोड येथील एक हॉटेल मध्ये पिडीतास घेऊन जावून तिच्या सोबत जबरदस्तीने शरीरसंबंध केले. त्यानंतर दि.१०/०५/२४ रोजी दोघे पुणे येथे वडगावला पळून जाऊन एका खोलीमध्ये राहत होते. त्यावेळी पिडिता ही माझ्या सोबत कधी लग्न करणार आहे असे विचारले असताना तिला तु गप्पा इथेच रहायचे म्हणून शिवीगाळी देऊन दमदाटी केली.
त्यानंतर पिडिताने बहिणीस फोन करुन बोलावून घेऊ दि.०९/०७/२४ रोजी आरोपीस वडगाव पोलीस स्टेशन येथे घेऊन गेले. त्यानंतर पिडिताने फौजदारी चावडी पोलीस स्टेशन येथे दि.१६/०८/२४ रोजी आरोपी विरुध्द दुष्कर्मची फिर्याद दाखल केली. तो तपासासाठी संकेत देवळेकर उप. विभागीय पो. अधिकारी सोलापूर ग्रामीण यांच्याकडे वर्ग झाला. तदनंतर आरोपी विरुध्द ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपीचे मे. न्यायालय सोलापूर येथे अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळल्यानंतर आरोपीने ऍड. रितेश थोबडे व ऍड. सचिन इंगळगी यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात अंतरिम अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला, अर्जाची सुनावणी मे. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश शिवकुमार डिगे साहेब यांच्यासमोर झाली. सदर पिडित व आरोपीचे शरिरसंबंध हे संमतीने झालेले असून दि.२९/०६/२४ रोजी पिडितेने पोलीसांसमोर आरोपीबरोबर लग्न केले असल्याचे व त्यांच्या विरुध्द काही तक्रार नाही, असा जबाब दिले असल्याचे निदर्शनास आणून दिल्याने, मे. न्यायाधिशांनी आरोपीस अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला.
*यात सरकार पक्षातर्फे ऍड.पी.पी. भोसले, तर पिडीता तर्फे ऍड. अंजली भुतिया यांनी तर आरोपी तर्फे ऍड. रितेश थोबडे व ऍड. सचिन इंगळगी यांनी काम पाहिले.*