crimemaharashtrapoliticalsocialsolapur

आंतरजिल्हा 02 गुन्हेगाराकडून, जबरीने चोरलेले 15 ग्रॅम सोन्याचे मंगळसुत्र व इतर ऐवज असा एकुण रु. 1,80,000/- (एक लाख एैंशीहजार/-) रुपये किंमतीचा मुददेमाल शहर गुन्हे शाखेकडून हस्तगत…

सोलापूर

 

दि. 15/04/2025 रोजी रात्री 07:45 वा.चे सुमारास तक्रारदार नामे सौ. रेखा सिध्देश्वर बिजली वय-33 वर्षे, गृहिणी रा. घर नं.199/बी, मंत्रीचंडक नगर, भवानी पेठ सोलापूर हया व त्यांच्या शेजारी राहणा-या दोन स्त्रिया अशा तिघी मिळून, रुपाभवानी मंदिर येथे देवदर्शनासाठी गेल्या होत्या. रुपाभवानी मंदिरात देवदर्शन करुन, मंत्रीचंडक नगरातील राहते घरी, त्या पायी तिघी चालत जात असताना, दिप हॉस्पीटल जवळ, सार्वजनिक रोडवर त्या आल्या असता, तेथे रस्त्याचे कडेला थांबलेल्या, एका अनोळखी इसमाने, तक्रारदार रेखा बिजली यांचे गळयातील, सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसका मारुन घेवून, जवळच मोटार सायकल घेवून थांबलेल्या त्याच्या साथीदारसोबत मोटार सायकलवरुन निघून गेला होता. सदर घटनेबाबत सौ. रेखा सिध्देश्वर बिजली, वय-33 वर्षे, गृहिणी रा. घर नं.199/बी, मंत्रीचंडक नगर, भवानी पेठ सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन जोडभावी पेठ पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे गुन्हा रजि नं. 246/2025 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 309(4), 3(5) प्रमाणे दि. 15/04/2025 रोजी गुन्हा दाखल आहे.

गुन्हयाचे घटनास्थळास गुन्हे शाखेचे व.पो.नि श्री. सुनिल दोरगे, स.पो.नि. शैलेश खेडकर व पथकाने भेट दिली व आजू बाजूचे परिसराचे निरीक्षण केले. सपोनि शैलेश खेडकर यांचे पथकातील पोलीस अंमलदार इम्रान जमादार व उमेश पवार यांनी घटनास्थळ परिसर व आरोपीतांचे घटनास्थळावरुन गुन्हा करुन निघून जाण्याचे मार्गावरील सी.सी.टी.व्ही फुटेजची पाहणी करुन, सदरचा गुन्हा करणारे इसमांबाबत अत्यंत कमी कालावधीत, कौशल्याने, तांत्रीक माहिती मिळवली. तसेच, सपोनि शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकाने सदरचा गुन्हा करणारे अनोळखी इसमांबाबत गोपनीयरित्या माहिती काढली.

दि. 02/05/2025 रोजी सपोनि शैलेश खेडकर यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार- इम्रान जमादार यांना, चोरी केलेले सोन्याचे मंगळसुत्र, विकण्यासाठी दोन इसम रुपाभवानी मंदिर मार्गे, सराफ बाजारात येणार असल्याची तसेच त्यांचेकडे नंबरप्लेट नसलेली यामाहा कंपनीची एफ-झेड मॉडेलची मोटार सायकल आहे अशी गोपनीय व खात्रीशीर माहिती बातमीदारा मार्फत मिळाली होती. त्यानंतर, सपोनि शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकाने, रुपाभवानी मंदिर जवळील पाणी गिरणी गेट समोरील रोडवर सापळा लावून, संशयीत आरोपी नामे- (1) हणमंत रामचंद्र बोडके वय-22 वर्षे, धंदा :- पिक अप ड्रायव्हर, मुळ रा. पाथरुड, जयवंत नगर, धाराशिव सध्या रा. अण्णाभाऊ साठे नगर, धाराशिव जि. धाराशिव (2) नागेश उर्फ नागनाथ द-याप्पा पाटोळे वय-23 वर्षे, धंदा- चालक मुळ रा. निरंकार कॉलनी, प्लॉट नं. 47, संजय नगर, सांगली सध्या रा. सचिन लगदिवे यांचे घरी भाडयाने, गणेश नगर, धाराशिव जि.धाराशिव यांना ताब्यात घेतले. त्यांचे ताब्यामध्ये त्यांनी गुन्हा करणेसाठी वापरलेली, (1) एक यामाहा कंपनीची एफ-झेड मॉडेलची काळया रंगाची मोटार सायकल किं. रु. 1,00,000/- व (2) त्या दोघांनी मिळून चोरी केलेले व विक्री करण्यासाठी आणलेले, एक सुमारे दिड तोळा वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र किं. रु. 70,000/- (3) एक विवो कंपनीचा मोबाईल रु. 10,000/- किंमतीचा असा एकुण 1,80,000/- (एक लाख एैंशी हजार/-) चा मुददेमाल हस्तगत करुन, रात्रीच्या वेळी घडलेला, जबरी चोरीचा अत्यंत गंभीर स्वरुपाचा गुन्हा, अल्पावधीत कौशल्याने उघडकीस आणला आहे.

सदरची कामगिरी मा. श्री. एम.राज कुमार, पोलीस आयुक्त, सोलापुर शहर, डॉ. दीपाली काळे, पोलीस उपायुक्त, गुन्हे, श्री.राजन माने, सहा.पोलीस आयुक्त गुन्हे तसेच श्री. सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे स.पो.नि. श्री. शैलेश खेडकर व पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे, विनोद रजपुत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड, सतीश काटे, बाळासाहेब काळे तसेच सायबर पो.स्टे कडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button