संस्था पदाधिकाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणी दोघास जामीन मंजूर

सोलापूर
येथील रहिवासी गणेश अशोक थोरात वय ४२ वर्षे, रा. सोलापूर व निलेश चंद्रकांत कांबळे, वय ४५ वर्षे, रा. सोलापूर या दोघांनी संस्थापक पदाधिकारी एस.डी. कांबळे यांना आत्महत्येस प्रवृत्त केले प्रकरणीच्या गुन्ह्यात सत्र न्यायालयाने काही अटीसह जामीन मंजूर केला.
याची थोडक्यात हकीकत अशी की, मयत एस.डी. कांबळे हे एका संस्थेचे पदाधिकारी होते यातील आरोपी निलेश चंद्रकांत कांबळे हे सदर संस्थेचे सदस्य होते. सदर निलेश कांबळे यांनी त्यांचे नावे प्लॉटधारक म्हणून लावावे म्हणून अर्ज दिला होता. सहनिबंधक यांचे समोर याचा वाद चालू होता. दि. १७/०३/२०२५ रोजी मयत एस.डी. कांबळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या खिशात एक चिट्ठी सापडली त्यामध्ये निलेश कांबळे व गणेश अशोक थोरात व अन्य एक यांनी मयत एस.डी. कांबळे यांना खोट्या तक्रारी करुन त्रास दिला, त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली अशा आशयाची फिर्याद मयताचा मुलगा एस. एस. कांबळे यांनी दिली, त्यावरुन गुन्हा दाखल होऊन आरोपीस फौजदार चावडी पोलीसांनी अटक केली होती.
त्याबाबत त्यांनी सोलापूर सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता, त्या जामीन अर्जाची सुनावणी होऊन त्यामध्ये आरोपीने कायदेशीर मार्गासाठी तक्रार करणे हा गुन्हा नाही, फिर्यादीतील कथानक तयार केलेले आहे, यातील आरोपीने त्यांना कधीच कोणताही त्रास दिला नाही, प्रकरणातील तपास पूर्ण झाला आहे, असा युक्तीवाद आरोपीचे वकिल अॅड. शशी कुलकर्णी यांनी केला त्यावर विचार होऊन सत्र न्यायालयाने आरोपींची रु. ५०,०००/- च्या जामीनावर मुक्तता करण्याचा आदेश पारीत केला.
यात आरोपीतर्फे अॅड. शशी कुलकर्णी, अॅड. गुरुदत्त बोरगावकर, अॅड. रणजित चौधरी, अॅड. प्रणव उपाध्ये, अॅड. प्रसाद अग्निहोत्री यांनी तर सरकारतर्फे अॅड. दत्ता पवार यांनी काम पाहिले.
कोर्ट मा. राणे कोर्ट साो