मोहोळ विधानसभा लढण्याचे शरद बनसोडेंकडून संकेत…

सोलापूर( दि.)आगामी विधानसभा निवडणुकीत मोहोळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे स्पष्ट संकेत माजी खासदार शरद बनसोडे यांनी आज दिले आहेत.
सोलापूररात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, महायुतीमध्ये ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. युती झाली आणि कदाचितही जागा भारतीय जनता पार्टीला सुटली तर भाजपाकडून आपण येथून निवडणूक लढवू. भाजपने आपल्याला संधी न दिल्यास आपण शरद पवार गटाकडून निवडणूक लढताल का? या प्रश्नावर शरद बनसोडे म्हणाले, जर..तर..चा प्रश्न आहे. मी यंदा निवडणूक लढणारच . राजकीय भूमिका घेत इतके दिवस पक्षासाठी खपलो आहोत.आणखी किती दिवस बाहेर राजकीय संधीची वाट पाहत थांबायचं. प्रसंग पडला आणि शरद पवार गटाने संधी दिली तर तिथूनही निवडणूक लढू.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकी मध्ये या मतदारसंघात विरोधात काँग्रेसला 65 हजार इतकं मताधिक्य मिळालं. आपण 2014 मध्ये लोकसभेला उमेदवार होतो. त्यावेळी भारतीय जनता पार्टीला 15 हजाराचं मताधिक्य मिळालं होतं. यानंतर या मतदारसंघात आपण गावोगावी संपर्क ठेवला, काम केली. आजही या भागामध्ये आपल्याला मानणारा मोठा वर्ग आहे. नुकत्याच झालेल्या मोठ्या पराभवानंतर पक्षाने इथे पराभव का झाला? याची कारण शोधण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात गावोगावी जाण्यास सांगितल आहे. आपण हे काम सुरू केलं असून मोहोळ, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर मधील अनेक गावांमध्ये जाऊन आलो आहोत. येथे केवळ जरांगे पाटील हा फॅक्टर आमच्या विरोधात मतदान जाण्यास कारणीभूत आहे असं नव्हे. भारतीय जनता पार्टीने या मतदारसंघात ज्यांच्यावर प्रचाराची जबाबदारी दिली होती. त्यांनी स्थानिक भाजपच्या युतीच्या कार्यकर्त्यांना एकत्रित आणून समन्वयान काम केलं नाही. याबाबतही अनेक ठिकाणी तक्रारी पुढे आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत आपल्याला प्रचारात सक्रिय करून घेण्यात आलं नव्हतं. याविषयी आपण पक्षाला पत्र देऊन विचारणा केली आहे असेही शरद बनसोडे यांनी सांगितलं. आता पक्षाने जबाबदारी दिली म्हणून या भागात फिरत आहे. लोकसभा निवडणुकीत युती विरोधात 65000 मतदान असलं तरी विधानसभेत ही स्थिती बदलू शकते ही शरद बनसोडे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले,येथील माजी आमदार राजन पाटील यांनी आपल्याला मागच्या लोकसभा निवडणुकीत शरद बनसोडे यांनाच उमेदवारी मिळायला हवी होती असं स्पष्ट मत व्यक्त केलं होतं. त्याआधी त्यांनी सहकार्याची भूमिका ही ठेवली होती. सध्या मोहोळ मध्ये अनेक प्रकारचे नवे मुद्दे आहेत. विद्यमान आमदारांविरोधात नाराजी ही दिसून आली आहे. मोहोळ विधानसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढवावी असं कार्यकर्त्यांचेही म्हणणं आहे.आपण यावर विचार करत आहोत. भारतीय जनता पार्टी सह सर्वच पक्ष वेगवेगळे लढले तर आपण भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक मैदानात उतरण्यास सज्ज आहोत. जनतेची सेवा करायची आहे.अन्य पक्षांनाही संधी दिली विशेषतः शरद पवार गटाने आपला विचार केला तर आपण तेथूनही निवडणुक लढऊ. आपण शरद पवारांना भेटणार आहात का? या विषयावर ते म्हणाले, जर आणि तर चा प्रश्न आहे. सध्या भाजप नेतृत्व विशेषता: देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली जबाबदारी आपण पार पाडत आहोत. मोहोळ मध्ये जनसंपर्क करीत आहोत. राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं असेही अखेरीस त्यांनी स्पष्ट करत कोणतीही भूमिका घेण्यास सज्ज असल्याचे स्पष्ट संकेत दिले.