फसवणूक प्रकरणी बिशी चालकास जामीन मंजूर…

सोलापूर-पूर्व भागातील 2७६ लोकांनी आठवडा बिशीपोटी भरलेली रक्कम रु 1 कोटी 78 लाख परत न दिल्याने फसवणूकीचा गुन्हा नोंद असलेल्या बिशी चालक अशोक रामय्या कैरमकोंडा वय-७८,रा.सोलापूर यांचा जामीन अर्ज मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.योगेश राणे यांनी मंजूर केला.
यात हकिकत अशी की, फिर्यादी हा सुमारे ४० वर्षापासून अशोक रामय्या कैरमकोंडा, अरविंद अशोक कैरमकोंडा, सुजाता अरविंद कैरमकोंडा यांच्याकडे बिशी म्हणून भरलेले पैसे घेवून त्यांनी फिर्यादीकडे दिलेल्या डायरीमध्ये नोंद करून त्यावर स्वतःची सही करून देत होते. तसेच नमूद बिशी चालकाकडे फिर्यादी बिशी स्वरूपात एकूण भरलेली रक्कम हि बिशी संपल्यानंतर मुळ जमा रक्कम व त्यावर त्यांनी १ टक्के रक्कम जादा स्वरूपात देत होते. अशा पद्धतीने वरील नमूद बिशी चालक यांनी चांगल्या प्रकारे बिशी चालवत होते परंतु कोविड १९ पासून आरोपींना घरगूती व आथिर्क अडचणी मुळे फिर्यादी व साक्षीदारांना कडून सन २०१९ २०२० २०२१ व २०२२ पर्यतची जमा करू घेतलेली रोख रक्कम १२,४५०००/रु मुददल रक्कम व त्यावरील १ टक्का रक्कम वरील लोकांनी देणे असल्यामुळे वेळोवेळी त्यांचे घरी जावुन मागणी करीत असताना वरील लोकांनी आज आज देतो, उदया देतो, आमचे घर विकले आहे ते पैसे आमच्याकडे आल्यावर आम्ही तुमची संपुर्ण रक्कम देतो, असे म्हणुन विश्वास संपादन करुन वरील लोकांनी पैसे देण्यास टाळाटाळ करण्यास सुरवात केली.
ॲड. संतोष न्हावकर
अधुनमधुनआर्थिक अडचणीमुळे वरील नमुद बिशी चालकाकडे जावुन वेळोवेळी रक्कम मागणी केली असता, अचानकपणे यातील अशोक रामय्या कैरमकोंडा दि ०७.११.२०२२ रोजी त्यांचे राहते घरातून निघुन गेला असताना देखील त्यांचा मुलगा व सुन यांनी सदर बाबत दि ०२.०११.२०२२ रोजी व दै. लोकमत व दिव्य मराठी या वर्तमानपत्रात अँड एस ओ उंबरजे तसेच अँड श्रीकांत कोठा यांचे मार्फतीने जाहीर नोटीस दिल्याने सदरची जाहीर नोटीस पेपरमध्ये वाचल्यानंतर फसवणुक झाल्याची खात्री झाल्याने वरील बिशी चालक यांच्या विरूद्ध सोलापुर शहरातील सुमारे २७६ लोकांना वरील सर्व बिशी चालक यांनी रक्कम रु 1 कोटी 78 लाख जमा करुन घेवुन ते पैसे सभासद यांना परत न देता फसवणुक केली आहे अशा आशयाची फिर्याद जेलरोड पोलीस स्टेशन येथे फिर्यादीने दाखल केली होती.
यामध्ये अशोक कैरमकोंडा यास पोलिसांनी अटक केली होती. आरोपीने जामीन मिळण्याकरिता अँड. संतोष न्हावकर यांच्या मार्फत सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.
यात आरोपीतर्फे युक्तिवाद करताना अँड. संतोष न्हावकर यांनी आरोपी हा मागील 40 वर्षांपासून बिशी चालवीत असल्याने व इतकी वर्षे तो सर्वांना व्याजासह रक्कम परत देत आलेला असल्याने त्याचा उद्देश फसवणुकीचा आहे असे म्हणता येणार नाही असे मे.कोर्टाचे निदर्शनास आणून दिले.तसेच त्या पुष्ठर्थ मे.सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्याय निवाडे दाखल केले सदरचा युक्तिवाद ग्राह्य माणून मे.न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला.
यात आरोपी तर्फे अँड संतोष न्हावकर ,अँड वैष्णवी न्हावकर, अँड.राहुल रुपनर, अँड चैतन्य नल्ला यांनी तर सरकार पक्षातर्फे अँड. माधुरी देशपांडे यांनी काम पाहिले.