crimemaharashtrasocialsolapur

सोलापूर तालुका, पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील मौजे तळेहिप्परगा येथील ग्रामदैवत हनुमान यात्रा डॉल्बी मुक्त वातावरणात साजरी…

सोलापूर

सोलापूर तालुका, पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रातील मौजे तळेहिप्परगा या गावातील ग्रामदैवत हनुमानाची यात्रा दिनांक 25.04.2025 रोजी होती. सदर यात्रेच्या अनुषंगाने दिनांक 24.04.2025 रोजी गावात किर्तन, भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
मौजे तळेहिप्परगा येथील ग्रामदैवत हनुमान देवाच्या यात्रेची मिरवणुक पोलीस प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देऊन डॉल्बीचा वापर न करता पांरपांरीक पध्दतीचे वाद्य वापर करून मिरवणुक काढणे बाबत तळेहिप्परगा येथील यात्रा पंच कमिटी यांनी व गावातील ग्रामस्थ यांनी निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे हनुमान देवाची मिरवणुक पांरपारीक पध्दतीच्या वाद्य वापर करून मिरवणुक शांततेत व वेळेत पार पाडली आहे.
मौजे तळेहिप्परगा येथील हनुमान यात्रेचा काठीचा मान हा मुस्लीम समाजातील श्री.उस्मान शेख याचेकडे तळेहिप्परगा गाव अस्तित्वात झाले पासुन आहे. उस्मान शेख हे नाशिक येथे फरशीच्या दुकानात काम करतात.

यात्रे करीता ते नाशिक येथुन एक महिन्या पासुन तळेहिप्परगा येथे थांबुन त्यांनी हनुमानाची काठी सजवुन एकात्मेचे उत्तम उदाहरण घडवुन दिले आहे. सदर यात्रे करीता श्री.रतिकांत पाटील, छावा संघटना उत्तर सोलापूर व पंच कमीटी, तळेहिप्परगा याचे सहकार्य लाभले आहे.
यात्रा कमिटी मधील सदस्य (1) श्री.विट्ठल रेवजे (2) श्री.उस्मान शेख (3) तानाजी सुरवसे (4) अभिजित पाटील (5) सुमित सावंत व (6) शशिकांत स्वामी या सर्वांचा मा.श्री.दिपक चव्हाण, अतिरिक्त कार्यभार उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर व पोलीस निरीक्षक श्री.राहुल देशपांडे यांनी सोलापूर तालुका, पोलीस ठाणे येथे डॉल्बीमुक्त मिरवणुक पार पाडल्याबद्दल त्यांचा वृक्ष देऊन सत्कार करून त्यांना भविष्यात अशाच प्रकारे उपक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सणोत्सवा दरम्यान कर्णर्र्कश्य डॉल्बीचा वापर करून हदयरोग, बहिरेपणा, उच्चरक्तदाब या सारख्या गंभीर आजारांना निमंत्रण देणा-या मिरवणुका काढणा-या तरूणाईसाठी हा आदर्श घालुन दिला आहे. अशाच मिरवणुका व समाज उपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन श्री.दिपक चव्हाण, पोलीस उपअधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण अतिरिक्त कार्यभार उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर यांनी केले आहे.
सदर यात्रे मध्ये कोणताही अनुचित प्रकार न घडता मिरवणुक शांततेत पार पाडावी या अनुषंगाने मा. श्री. संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर, श्री.दिपक चव्हाण पोलीस उपअधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण अतिरिक्त कार्यभार उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर याचे मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री.राहुल देशपांडे यांचे नेतृत्वाखाली पोसई/घोडके, सपोफौ/ बानेवाले, पोहवा/नागेश कोणदे व मनोज भंडारी यांनी चोख बंदोबस्त केला आहे.
—00—

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button