maharashtrapoliticalsocialsolapur

जिल्हा अध्यक्षपदी ज्योतिबा गुंड तर शहराध्यक्षपदी बसवराज कोळी…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत पक्षाच्या निवडी : तालुका अध्यक्षांचीही घोषणा...

 

सोलापूर : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्षाच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी ज्योतिबा गुंड आणि सोलापूर शहराध्यक्षपदी बसवराज कोळी यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीचे पत्र वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष जितेंद्र सातव व महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुख्य प्रवक्ते उमेश (दादा) पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे, महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी करण्यात आल्या.

शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पक्षाच्या बैठकीत या निवडी जाहीर करण्यात आल्या. याप्रसंगी सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी वैद्यकीय मदत कक्षाच्या तालुकाध्यक्षांच्याही निवडी करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्षाचे नवनियुक्त पदाधिकारी पुढीलप्रमाणे : सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष रमेश शिंदे, मोहोळ तालुका संपर्कप्रमुख महेश शिंदे, सांगोला तालुका अध्यक्ष अजय उबाळे, पंढरपूर तालुकाध्यक्ष श्री विक्रम गायकवाड, माढा तालुका अध्यक्ष प्रवीण पवार, सांगोला शहर अध्यक्ष बापूसाहेब देवकते, महूद (ता. सांगोला) आरोग्य विभाग अध्यक्ष विनय पवार, मोहोळ तालुका अध्यक्ष सारंग गायकवाड, मोहोळ तालुका उपाध्यक्ष धनराज चंदनशिवे.

यावेळी मुख्य राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी आरोग्य क्षेत्रातील सामाजिक कामांविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी राष्ट्रवादी वैद्यकीय मदत पक्षाचे प्रदेश संपर्कप्रमुख सचिन सरवदे, व्हीजेएनटी सेलचे सोलापूर जिल्हाध्यक्ष विशाल वाघमारे, शहराध्यक्ष रुपेशकुमार भोसले, उपाध्यक्ष कुणाल धोत्रे, गणेश छत्रपती, शशिकांत डोलारे, संकेत माने, नकुल धवन उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button