छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची तत्कालीन शिष्टाचार पद्धत आज असती तर पहिलगाम सारखा भ्याड हल्ला आज झाला नसता घटनेचा निषेध :-पुरुषोत्तम बरडे…
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती मिरवणुकीत आजच्या पिढीने व्यसनमुक्ती चा संदेश द्यावा:- आमदार विजयकुमार देशमुख...

सोलापूर
धर्मासाठी जीवाचे रान करून आपल्या प्राणाची आहुती दिली असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर छावा सामाजिक संघटनेच्या वतीने उमा नगरी येथे जयंती उत्सव पूर्व बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या फोटो उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार विजयकुमार देशमुख, श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर नाना काळे,पुरुषोत्तम बरडे , श्रीकांत घाडगे , राम जाधव , श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव अध्यक्ष निशांत सावळे,बंटी सोनके,हरिभाऊ चौगुले, संजय कोळी यांची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित समुदायाने छत्रपती शिवाजी महाराज की जय , धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, अश्या घोषणांनी उमा नगरी परिसर दणाणून सोडला होता.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार सोहळा आनंदी वातावरणात पार पडला.
यानंतर पुरुषोत्तम बरडे व आमदार विजयकुमार देशमुख यांनी त्यांच्या भाषणात जगात दोनच राजे होऊन गेले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज,आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. आज त्यांची जयंती साजरी करत असताना आजच्या पिढीने त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून व्यसनमुक्तीचा संदेश प्रस्थापित करत ही जयंती साजरी करायला पाहिजे. प्रजेचे रक्षण कसे करावे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं.तर धर्माच्या रक्षणासाठी दुष्मनांच्या चारी मुंड्या चित करून अखेर च्या श्वासापर्यंत धर्माचे रक्षण केले ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आजच्या युगात ते विचार घरोघरी पोहोचवून जयंती साजरी केली तर खऱ्या अर्थाने त्यांच्या आठवणींना उजाळा मिळेल.
डॉल्बी ऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर जयंती मिरवणुकीत होणे अपेक्षित आहे . या जयंतीच्या पार्श्वभूमीवर वाटपट खर्चाला फाटा तो खर्च सामाजिक उपक्रम घेऊन त्या ठिकाणी खर्च करून समाजापुढे वेगळा आदर्श निर्माण करण्याचे काम आजच्या तरुणांनी केले पाहिजे.
तसेच पहिलगाम भ्याड हल्ल्याचा पार्श्वभूमीवर अतिरेक्यांचा निषेध करत औरंगजेब पेक्षा छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आज असते तर असे हल्ले झालेच नसते . या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध.आणि अतिरेक्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या भारतीयांना भावपुर्ण श्रद्धांजली यावेळी वाहण्यात आली.
आज भारतीयांच्या मृत्यूचा बदला पाकिस्तानी अतिरेक्यांचा खात्मा करून झालाच पाहिजे . पाकिस्तानी नागरिकांना भारतातून हाकलून दिलेच पाहिजे . व आपल्या भारतीयांना सुखरूप पुनश्च: भारतात आणलेच पाहिजे अशी प्रतिक्रिया वेळी व्यक्त करण्यात आली.
तसेच पोलिसांनी दिलेल्या नियमांचे उल्लंघन कोणत्याही मंडळानी करू नये नियोजित वेळेत व मिरवणुकांना गालबोट न लागता आपल्या धर्मरक्षक राजाची जयंती सर्व शंभू प्रेमींनी जल्लोषात साजरी करावी असे ही आवाहन बरडे व आ.देशमुख यांनी यावेळी केलं. या बैठकीस शंभू प्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती…