शिवसेना शिंदे गटाकडून पहिल्या टप्प्यातील उमेदवारीची यादी जाहीर मात्र सोलापूरचा तिढा काय सुटेना ??…
शहर मध्यची जागा कुणाला सुटणार ? शिवसेना शिंदे गटाचा संभावित उमेदवार कोण ?...

सोलापूर
राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर राष्ट्रीय अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी नुकतीच जाहीर केली . राज्यातील विविध ठिकाणी शिवसेनेकडून ४५ उमेदवारांची यादी पहिल्या टप्प्यात जाहीर करण्यात आली.यामध्ये सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली तर परांडा येथून डॉ.तानाजी सावंत यांना उमेदवारी देण्यात आली.
सोलापूरच्या सध्य स्थिती बाबत बोलायचे झाले तर मंगळवारी सायंकाळच्या सुमारास भाजपचे देवेंद्र कोठे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असल्याचे वृत्त सूत्रांकडून प्राप्त झाले होते.काही वृत्तवाहिन्यांनी अश्या बातम्याही प्रसारित केल्या. या बातम्यांमुळे एकच खळबळ उडाली.आणि देवेंद्र कोठे यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर पोस्ट टाकायला ही सुरुवात झाली .शहर मध्य हा शिंदे गटाला सुटणार अफवांवर विश्वास ठेवू नका शिवसेनेचाच उमेदवार शहर मध्य ची जागा लढणार अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी प्रसार माध्यमांना दिली.
अद्याप शहर मध्य मतदार संघाचा तिढा सुटला नसल्याने व शिंदे गट आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने चर्चेला उधाण आलंय. शहर मध्यच्या उमेदवारी बाबत शिवसेनेचे शहर प्रमुख मनोज शेजवाळ, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे,मनीष काळजे ,शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रा. डॉ.ज्योती वाघमारे, सध्या मुंबईत ठाण मांडून आहेत .शहर मध्य जागेसाठी शिवसेनेचाच उमेदवार उभा केला जावा यासाठी स्थानिक शिष्टमंडळ पक्ष श्रेष्ठींकडे अट्टाहास धरून आहेत. याबाबत हालचालींना आता वेग आला आहे. दरम्यान राष्ट्रीय अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी देण्यात आलेल्या ४५ शिवसैनिकांची यादी आपल्या सोशल पेजवर प्रसारित केली आहे.शहर मध्य च्या जागेकडे सोलापूर करांसह संपूर्ण राज्याचे विशेष लक्ष लागून राहिले आहे…..