india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

पैलवान निकंबे यांचा शिवसेना { उभाठा} गटाला जय महाराष्ट्र तर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश…

 

इंदापूर :

आज भरणेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री मा. दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीमध्ये सोलापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर विष्णू पैलवान निकंबे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये अधिकृत रित्या प्रवेश करण्यात आला. कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी राष्ट्रवादी परिवारात स्वागत करत, पुढील यशस्वी राजकीय वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या व सर्वांनी मिळून एकजुटीने एक दिलाने काम करून सोलापूर महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त नगरसेवकांची संख्या वाढण्यासाठी प्रयत्न करावा अशी भावना व्यक्ती केली.
विष्णू पैलवान निकंबे यांनी सोलापूर महानगरपालिका 2007 सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सोलापूर महानगर पालिकेचे उपमहापौर पद भूषविले आहे. 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये शिवसेना या पक्षाकडून विष्णु निकंबे यांना उमेदवारी देण्यात आली होती.

 

 

यावेळी विष्णू पैलवान निकंबे यांनी “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हि माननीय अजितदादा पवार यांचे नेतृत्वाखाली सदैव शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या पुरोगामी वैचारिक भूमिकेवर आधारित विचारधारेतून संघटनात्मक व सामाजिक बांधिलकी जपत आली आहे. पक्षाने कायम केवळ विकासाभिमुख समाजकारणाला अग्रक्रम दिला असून, ह्याच वाटेवर आपण वाटचाल करणार असल्याची इच्छा व्यक्त केली.

 

विष्णू पैलवान निकंबे यांच्या पक्षप्रवेशाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी परिवारात एका नवीन ऊर्जेचा संचार झाला असून, ह्या भागात पक्षाची अधिक ताकद निर्माण झाली आहे.

 

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार ,कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान , प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे ,माजी परिवहन सभापती आनंद मस्तरे नगरसेवक गणेश पुजारी अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa