मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापकांनी सोलापूर विभागाची व्यापक पाहणी केली

सोलापूर
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री विजय कुमार यांनी सोलापूर रेल्वे विभागातील प्रमुख ठिकाणांची विस्तृत पाहणी केली. या भेटीत पायाभूत सुविधा विकास, प्रवासी सुविधा, कोचिंग सुविधा आणि भविष्यातील विस्तार कामांवर लक्ष केंद्रित केले गेले, जे रेल्वेची ऑपरेशनल कार्यक्षमता आणि ग्राहक सेवा सुधारण्याची वचनबद्धता दर्शवते.
महाव्यवस्थापक यांनी खालील गोष्टींची पाहणी केली:
– वाडी-शहाबाद दरम्यान चालू कामांचा आणि ऑपरेशनल तयारीचा आढावा घेतला.
– हिरेनंदुरू येथे भविष्यात होणाऱ्या प्रकल्पासाठी ची प्रस्तावित ग्रीनफील्ड जागेची तपासणी केली
– कलबुरगि येथे, नियोजित कोचिंग सुविधा व कामांची विस्तृत पाहणी केली.
– टिकेकरवाडी येथे, भविष्यातील वाहतूक मागणीसाठी कोचिंग पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी कोचिंग कॉम्प्लेक्स आणि त्याच्या मास्टर प्लॅनचा आढावा घेतला.
– होटगी येथे, अल्ट्राटेक सिमेंट साइडिंगची पाहणी केली.
– बाळे स्थानक येथे, मालवाहतूक हाताळणी क्षमता वाढवणे आणि वाहतूक सुधारणे या उद्देशाने प्रस्तावित मालवाहतूक शेड साइटला भेट दिली.
– सोलापूर येथे, कोचिंग डेपोमधील सुविधांचा आढावा घेतला, देखभाल तयारी आणि प्रवासी सेवा पायाभूत सुविधांचे मूल्यांकन केले.
नंतर, श्री विजय कुमार यांनी सोलापूर विभागाच्या शाखा अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. त्यांनी चालू कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि भविष्यातील विकासात्मक उपक्रमांसाठी मौल्यवान मार्गदर्शन केले. त्यांचे निर्देश सुरक्षितता, कार्यक्षमता, पायाभूत सुविधा वाढवणे, चांगला प्रवासी अनुभव आणि कर्मचारी कल्याण यावर केंद्रित होते.
महाव्यवस्थापकांसोबत प्रधान मुख्य अभियंता (PCE), प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता (PCME), मुख्य प्रवासी वाहतूक व्यवस्थापक (CPTM), विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM), सोलापूर आणि विभागातील इतर शाखा अधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकारी होते.
सोलापूर विभागातील प्रवाशांना आणि मालवाहतूक ग्राहकांना पायाभूत सुविधांचे अपग्रेड, सुविधांचा विस्तार आणि सुधारित आणि विश्वासार्ह सेवा प्रदान करण्यासाठी मध्य रेल्वेच्या सततच्या प्रयत्नांवर ही तपासणी अधोरेखित करते.



