नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी धाकटा राजवाडा येथील सुुरज भाय सह अन्य तिघांवर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल ….
डॉल्बीसह,कंटेनर ही जप्त तब्बल दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत...

सोलापूर भाजपा शहर मध्य विधानसभेच्या मध्यपूर्व मंडल अध्यक्ष श्री.अक्षय अंजिखाने,मध्य-मध्य मंडल अध्यक्ष श्री.नागेश सरगम, मध्य पश्चिम मंडल अध्यक्ष श्री.नागेश खरात यांची नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
शुभेच्छुक :- सोलापूर शहर मध्य विधानसभा पदाधिकारी व सदस्य
सोलापूर
भीमजयंती निमित्त शहरात रविवारी सर्वत्र विविध मंडळांच्या मिरवणुका जल्लोषात संपन्न झाल्या. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर पोलिसांनी कारवाई केली.त्यापैकीच एक धाकटा राजवाडा मंडळ. हिंदी – मराठी चित्रपटांचे गाणे दिलेल्या नियमापेक्षा मोठ्या आवाजात वाजवून दुसऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य केल्याने फौजदार चावडी पोलिसांनी डॉ .बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरज गायकवाड , उत्सव अध्यक्ष उमेश खंडागळे , संकेत माऊली बोंडवे , ऋषभ अनिल दुपारगुडे दोघेही राहणार पुणे यांच्यावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात पोलिस कॉन्स्टेबल विठ्ठल जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम २२३,२९३, १२५ सह महा. पो. अधिनियम १९५१ चे कलम ३७(१), इ १३५ ,पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम १५ (१) ,१९ प्रमाणे गुन्हा दाखल केला. व डॉल्बी ही जप्त केली.
ही कारवाई पोलिस आयुक्त एम राजकुमार यांच्या आदेशान्वये ,पोलिस उपायुक्त परिमंडळ डॉ.विजय कबाडे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त पोमण यांच्या नेतृत्वात फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने,दुय्यम पोलीस निरीक्षक दराडे यांच्या अधिपत्याखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धायगुडे , पोलिस उप निरीक्षक पाटोळे यांनी व त्यांच्या पथकातील अन्य कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली…