crimemaharashtrapoliticalsocialsolapur

News latest:-अँड राजेश कांबळे खून खटल्यास पुन्हा प्रारंभ : प्रवीण वाडेची महत्त्वपूर्ण साक्ष…

 

सोलापूर

दिनांक- ॲड. राजेश श्रीमंत कांबळे वय 45 राहणार 43, ब्रह्मचैतन्य नगर नवीन आर. टी. ओ. सोलापूर याचा खून केल्याप्रकरणी आरोपी संजय उर्फ बंटी महादेव खरटमल, अँड सुरेश तारू चव्हाण व श्रीनिवास महांकाळी येलदी यांच्यावर भरलेल्या खटल्याच्या सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.जे.जे.मोहिते यांच्यासमोर सुरू झाला.

यात हकीकत अशी की, दिनांक 8-6-2019 रोजी यातील मयत अँड राजेश कांबळे हा सकाळी अकरा वाजेचे सुमारास पक्षकारांना भेटून एका तासाने परत येतो असे त्याच्या पत्नीस सांगून त्याच्या घरातून मोटरसायकलवर निघून गेला होता.
त्यानंतर त्याच्या पत्नीने दुपारी बाराच्या सुमारास फोन लावला असता मयत राजेश याने मी बंटीच्या घरी आहे केस संदर्भात चर्चा चालू आहे असे सांगितले .त्यानंतर त्याची पत्नी त्याचा भाऊ यांनी फोन लावला असता मयत राजेश याचा फोन बंद लागत होता. रात्री शोधा शोध केली तरी मयत राजेश कांबळे हा मिळून आला नाही. त्यावर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली होती. तपासादरम्यान यातील आरोपी बंटी खरटमल याच्यावर संशय बळावला तसेच पोलिसांना बंटी खरटमल याच्या घरातून दुर्गंधी येत असल्याचे दिसून आले. त्यावेळी पोलिसांनी घराचे कुलूप तोडून आत पाहिले असता मयत राजेश कांबळे याचे हात, पाय,धड व मुंडके हे तोडून दोन प्लास्टिक बॅगेत भरलेले दिसून आले. त्यावर पोलिसांनी खुनात सहभाग असलेले वरील तिन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले होते.

*खटल्याच्या सुनावणीच्या वेळी साक्षीदार प्रवीण वाडे याने आपल्या साक्षीत दिनांक 07/06/2019 रोजी त्यांच्या गल्लीतील कोकणे यांच्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता. त्यावेळी आरोपी बंटी हा देखील तिथे होता. त्यावेळेस आरोपी बंटी यांनी साक्षीदार प्रवीण वाडे यास “मी व मजा मित्र दोन दिवसात मोठी गेम करणार आहे.” त्यावर साक्षीदार प्रवीण याने कसली गेम करणार आहे असे विचारले असता आरोपी बंटी ने हसत हसत प्रवीण यास तुझी चेष्टा केली. असे म्हणाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दि:-8/6/2019 रोजी सकाळी 11:30 वाजता मयत ॲड. राजेश कांबळे, ॲड. सुरेश चव्हाण व संजय उर्फ बंटी खरटमल हे तिघे बंटी याच्या घरासमोर गप्पा मारीत उभे असल्याचे दिसले. म्हणून आरोपी बंटी यास, “आज दोन दोन वकील हिकडे आले आहेत काही पार्टी वगैरे ठेवली आहे का ?” असे विचारल्या वर दोन्ही वकील हसले व बंटीने वकील साहेबांसाठी जेवण केले आहे असे सांगून ते तिघेही आरोपी बंटी याच्या घरात गेले. अशी महत्त्वपूर्ण साक्ष प्रवीण वाडे यांनी नोंदवली.*

आरोपींच्या वकिलांनी घेतलेल्या उलट तपासात साक्षीदाराने नकारात्मक उत्तरे दिली.

या खटल्याची पुढील सुनावणीस 19/05/2025 ही तारीख नेमण्यात आली.

या खटल्यात विशेष सरकारी वकील अँड. उज्वल निकम, मूळ फिर्यादीतर्फे अँड.मिलिंद थोबडे अँड.विनोद सूर्यवंशी तर आरोपी नंबर 1तर्फे अँड राजेंद्र फताटे आरोपी नंबर 2 तर्फे अँड नागराज शिंदे आरोपी नंबर ३ तर्फे अँड जयदीप माने हे काम पाहत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button