maharashtrapoliticalsocialsolapur

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला”शिका, संघटित व्हा, आणि संघर्ष करा” हा मूलमंत्र आपण सदैव लक्षात ठेवावे :- संतोष पवार जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी…..

सोलापूर

आज १४ एप्रिल रोजी, संविधान निर्माते, सामाजिक क्रांतिकारक आणि भारतीय इतिहासातील महान विचारवंत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण देशभर साजरी केली जात आहे. त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वामुळे भारताला एक नवी सामाजिक आणि राजकीय दिशा मिळाली..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी, समानतेच्या हक्कासाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या न्यायासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून आधुनिक भारताचा पाया रचला.
दरवर्षी ही जयंती जल्लोषात साजरी करण्यात येत असते.त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने डाॅ बाबासाहेब आंबेडकर चौक येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास शहर सरचिटणीस श्यामराव गांगर्डे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, जय भीम अशा घोषणांनी डाॅ बाबासाहेब आंबेडकर चौक परिसर दणाणून सोडला होता.यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सोलापूर शहर – जिल्हा वासियांना शुभेच्छा दिल्या…

यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, हेमंत चौधरी,जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले , अनिल उकरंडे, महिला आघाडी कार्याध्यक्ष चित्रा कदम,जेष्ठ नेत्या सायरा शेख सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव ,उपाध्यक्ष शकिल शेख ,युवक प्रदेश उपाध्यक्ष साजिद पटेल, युवती अध्यक्ष किरण माशाळकर , सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसोडे, सहकार सेल विभाग अध्यक्ष भास्कर आडकी, दिव्यांग सेल विभाग अध्यक्ष एम. एम.इटकळे,कामगार आघाडी विभाग अध्यक्ष मार्तंड शिंगारे, OBC सेल विभाग कार्याध्यक्ष आयुब शेख, सुरेखा घाडगे , वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी, प्रज्ञासागर गायकवाड,सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, शहर सचिव दत्तात्रय बनसोडे,दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे, सुरज खांडेकर , शुभम घनाते , निखिल नागणे, यांच्या सह सर्वच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button