Speed news:- रामगिरी महाराज यांच्या विरोधात जेलरोड पोलीस ठाण्यात एम आय एम च्या वतीने तक्रार दाखल…
जनसमुदायासमोर मुस्लिम धर्माची व धर्मगुरुची प्रतिमा मलीन करणाऱ्या रामगिरी महाराजांवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा फारूक शाब्दी यांची जेलरोड पोलिसांकडे मागणी ...

सोलापूर
रामगीरी गुरु नारायण गिरी महाराज, सरला बेट यांनी मौजे पंचाळे, ता. सिन्नर, जि. नाशिक या ठिकाणी सप्ताहा दरम्यान प्रवचनामध्ये उपस्थित जनसमुदायासमोर मुस्लिम धर्माची व धर्मगुरुची प्रतिमा मलीन होईल, असे जाणिवपूर्वक प्रवचन केले आहे.
भारतात एक कोटीपेक्षा अधिक मुस्लिमांनी इस्लाम सोडला आहे. दहा-वीस वर्षे ज्यांनी मौलाना म्हणून काम केले आहे. त्यांनी इस्लामचा सुक्ष्म अभ्यास केला असता, त्यांना यात अन्याय- अत्याचाराशिवाय काहीही आढळून न आल्याने त्यांनी इस्लाम धर्म सोडून दिला आहे. मोहम्मंद पैंगबर यांनी वयाच्या पन्नासाव्या वर्षी सहा वर्षाच्या मुलीसोबत विवाह केला. ज्यांचे आदर्शच अत्याचारी आहेत, त्यांच्याबाबत अजून काय सांगायचे? अशा स्वरुपात त्या प्रवचनामध्ये मुस्लिम धर्मियांबाबत मोठ्या प्रमाणावर अनेक वक्तव्ये रामगीरी गुरु नारायण गिरी महाराज, सरला बेट, ता. वैजापूर जि. औरंगाबाद यांनी केली आहेत. या वक्तव्यामुळे व अशा प्रकारच्या प्रवचनामुळे हिंदू- मुस्लिम या दोन समाजामध्ये मने कलुषित करुन जातीय तणाव, धार्मिक द्वेष पसरवण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न केला जात आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी अशा भामट्या रामगीरी महाराजाकडून मुस्लिम धर्मियांविरोधात जाणुनबुजुन धार्मिक भावना दुखवुन जातीय दंगल घडविण्याच्या इराद्यात व्यक्तव्य करुन घेण्यात येत असल्याचे समजते.
तरी दोन धर्मियांमध्ये जाणुनबुजुन जातीय तेढ निर्माण करुन धार्मिक कलह, द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रामगीरी गुरु नारायण गिरी महाराज, सरला बेट यांच्यावर गुन्हा दाखल करून तातडीने अटक करावी अशी मागणी अब्दुल्ला डोणगावकर यांनी जेलरोड पोलिसांकडे केली…
हे निवेदन देतेवेळी शुक्रवारी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे जिल्हाध्यक्ष हाजी फारुखभाई शाब्दी ,
अझहर हुंडेकरी, गाझी जहागीरदार, नदिम डोणगांवकर, दौला कुमठे, इम्रान हाफिज साजन, मोहसिन मैंदर्गीकर, कम्मो शेख, अशपाख बागवान, हारीस कुरेशी,इक्बाल पठान, जुबेर कुरेशी, अज्जो शेख, याकुब शेख, जावेद शेख, उमर बागवान, बाबा पठान, जुबेर बसरी, एजाज बागवान, सद्दाम नाईकवाडी, मुदस्सर शेख, एजाज कोरबु, शहनवाज शेख यांची उपस्थिती होती…