राजकीय वैमनशातून तरुणाचा खून: दोन तरुणांची निर्दोष मुक्तता:- ॲड.मिलिंद थोबडे

सोलापूर
राजवैभव रघुनाथ कांबळे राहणार दादपूर ता. मोहोळ याचा खून केल्याप्रकरणी विशाल दत्तात्रय कांबळे व 24 विकी दत्तात्रय कांबळे व 19 या दोघे राहणार दातपूर तालुका मोहोळ यांच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री योगेश राणे यांच्यासमोर होऊन पुराव्या अभावी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
या हकीकत अशी की मयत राजवैभव हा बीए च्या पहिल्या वर्गात शिक्षण घेत होता. दिनांक 18 .2 .2021 रोजी त्याचे वडील हे भजनाच्या कार्यक्रमासाठी जात असताना मयत राजवैभव हा आरोपी विकी कांबळे याच्यासोबत मोबाईल खेळत बसला होता. भजन संपल्या नंतर त्याचे वडील घरी आले असता त्यांना मयत राजवैभव हा घरात दिसला नाही. त्यावर त्यांनी त्यांच्या पत्नीकडे चौकशी केली असता मयत राजवैभव हा शौचास गेल्या असल्याचे सांगितले. मयत हा बराच वेळ झाला तरी घरी आला नसल्याने मताच्या वडिलांनी व इतरांनी त्याचा शोध घेतला तसेच आरोपी विकी कांबळे व त्याचा भाऊ विशाल कांबळे याच्याकडे देखील चौकशी केली परंतु तो मिळून आला नाही. त्यामुळे मयताचे वडील रघुनाथ कांबळे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून मयत राजवैभव याचे अपहरण आरोपीने केले असल्याची फिर्याद कामती पोलीस ठाण्यात दिली होती.
त्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला असता केला असता आरोपी विशाल व विकी कांबळे यांना अटक केली. तपासा दरम्यान त्यांनी मताचा खून करून त्याचे प्रेत ज्या ठिकाणी पुरले ते ठिकाण दाखवले व मयतास शेवटी पाहणाऱ्या साक्षीदारांचे जबाब नोंदवून पोलिसांनी आरोपींन विरुद्ध दोषारोप पत्रक दाखल केले होते.
यात सरकारतर्फे एकंदर 29 साक्षीदार तपासण्यात आले
खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस आरोपीचे वकील एडवोकेट मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तिवादात सरकारी पक्षाने मयताची ओळख शाबित केली नाही, मयताचे प्रेत काढून दिल्याचा तसेचआरोपीस शेवटी एकत्र पाहिलेले साक्षीदार हे देखील विश्वास पात्र नाही केवळ राजकीय वैमनश्य पोटी आरोपी करण्यात आले आहे त्यामुळे आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात यावी असा युक्तिवाद मांडला त्यावरून न्यायाधीशांनी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
यात आरोपीतर्फे एडवोकेट मिलिंद थोबडे, एडवोकेट सतीश शेटे यांनी तर सरकारतर्फे एडवोकेट दत्ता पवार यांनी काम पाहिले
सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत
विमानसेवा प्रारंभ करून सोलापूरच्या उद्योग व्यवसायाला भरारी देणाऱ्या पुनश्च: मुख्यमंत्री विराजमान झाल्या नंतर प्रथमच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब अर्थात आपले “देवाभाऊ” यांचे व केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री व खासदार पुणे लोकसभा माननीय नामदार मुरलीधर आण्णा मोहोळ आपणा दोघांचे सोलापूरच्या पावन नगरीत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत…..
स्वागतोस्तुक :- श्रीयुत देवेंद्र राजेश कोठे
सोलापूर शहर मध्य विधानसभा आमदार
संस्थापक स्व. विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान सोलापूर….