बालिकेवर दुष्कर्म केल्याप्रकरणी युवकास मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मंजूर…

सोलापूर दि:-
बालिकेवर दुष्कर्म केल्याप्रकरणी अटकेत असलेला योगीराज राजकुमार वाघमारे वय 25, रा कुरुल ता मोहोळ, जि:- सोलापूर यास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन आर बोरकर यांनी जामीन मंजूर केला.
यात हकीकत अशी की यातील पीडितेचे व आरोपीची 2022 पासून इंस्टाग्राम वरती मैत्री होती. तिला दि:- 14/12/ 2022 रोजी मेसेज व चॅटिंग करून फूस लावून तिस पंढरपूर येथे बोलावून घेतले त्यानंतर तिस कोल्हापूर येथे घेऊन जाऊन तीच्यावर दुष्कर्म केले, अशा आशयाची फिर्याद पीडितेच्या आईने पंढरपूर पोलीस ठाण्यात दिली होती, त्यावरून आरोपीस अटक झाली होती.
आपणास जामीन मिळावा म्हणून आरोपी योगीराज याने पंढरपूर सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता, तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता.
ॲड. रितेश थोबडे
त्यावर आरोपी योगीराज याने ऍड रितेश थोबडे यांचेमार्फत मुंबई उच्च न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता.
जामीन अर्जाच्या सुनावणीच्या वेळी ऍड रितेश थोबडे यांनी आपले युक्तीवादात, गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला असून खटला दोन वर्षापासून प्रलंबित असून खटला अद्याप चालू झाला नसल्याने आरोपीस जामीन देण्यात यावा असे मुद्दे मांडले, त्यावरून न्यायमूर्तींनी 25,000/- रुपयांच्या जातमुचलक्यावर आरोपीस जामीन मंजूर केला.
*यात आरोपीतर्फे ऍड. रितेश थोबडे यांनी तर सरकारतर्फे ऍड. सी.डी.माळी यांनी काम पाहिले.*