maharashtrapoliticalsocialsolapur

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे यांच्या सहकार्याने प्रभागाचा चौफेर विकास होणार- किसन जाधव…

प्रभाग २२ येथे रस्ता काँक्रिटीकरण कामांचा शुभारंभ...

 

महायुती सरकारच्या माध्यमातून प्रभाग क्र.२२ मधील नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी सर्वाधिक निधी खेचून आणणार-किसन जाधव

सोलापूर- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे,सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या सहकार्याने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून सोलापूर महानगर पालिकेच्या अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत (सन२०२४-२५ ) १० लाख ९७ हजार १५६ रुपये खर्चित प्रभाग २२ येथील मातंग समाज स्मशानभूमी ते सोनी नगर कोपरा रस्ता मोदी हुडको कॉंक्रिटकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला.

प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, येलगुंडे मावशी,सत्यभामा पवार,सुनंदा उमाटे, वैशाली डोलारे, योगिता ताई पवार, ज्योतीताई बाबुराव संगेपाग,शकुंतला कोटमाळे, चंद्रमा ओलेकर,सविता ताई बंगले, महालक्ष्मी म्हेत्रे, मुक्ता वागळे, तनुजा पवार, सिद्धम चलवादी, हरीश तेलुगु, राजू पवार,आर्यन साळुंखे, नागेश म्हेत्रे, जगदीश सोनेरीकर,राजाभाऊ अल्कोड ,युवराज किसन गायकवाड, सागर किसन गायकवाड, सचिन किसन गायकवाड,वसंत पवार, नागेश ढेंगळे,नारायण धुमाळ मोहन पवार आदींच्या उपस्थितीत या रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचं विधिवत पूजन करून शुभारंभ करण्यात आला.

 

यावेळी बोलताना प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव म्हणाले की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मा.खा.सुनील तटकरे साहेब,सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे आणि भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या सहकार्याने प्रभाग २२ च्या सर्वांगीण विकासासाठी पाठपुरावा केला होता राष्ट्रवादी पक्ष हा महायुतीमध्ये घटक पक्ष आहे महायुतीतील घटक पक्षांना पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे यांनी आम्हाला सहकार्याचे भूमिका दाखविले यामुळे प्रभागातील नागरिकांना या निमित्ताने मोठा दिलासा मिळणार आहे.

प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढील काळात महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आणखीन भरघोस निधी आणून प्रभागाचा चौफेर विकास होणार आहे. या रस्ता काँक्रिटीकरण कामा शुभारंभ प्रसंगी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी किसन जाधव यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे आणि भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांचे सहकार्याबद्दल आभार देखील मानले या पुढील काळात देखील ते प्रभाग २२ च्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करतील अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button