मोडनिंब येथे पार्थ दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा संपन्न उदय दादा माने यांचा स्तुत्य उपक्रम….

सोलापूर /प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार यांचे सुपुत्र पार्थ (दादा) पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोडनिंबचे सुपुत्र तथा उदयकीर्ती एंटरप्राइजेसचे मालक तसेच उदय किर्ती अर्बन बँकेचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे विश्वासू नेते उदय (दादा) माने यांनी भव्य अशा खुला गट रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते.या राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन संत सावता महाराजांचे वंशज ह.भ.प रमेश महाराज वसेकर व रयत क्रांती संघटनेचे पक्ष प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक सुहास पाटील सोलापूर अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा लतीफ तांबोळी तसेच उदय कीर्ती अर्बन बँकेचे चेअरमन उदय माने तसेच बँकेच्या संचालिका शुभांगी माने,संचालक प्रशांत कोरडे,पत्रकार मारुती वाघ,मिथुन माने,उज्वल माने,बँकेचे मॅनेजर साईप्रसाद काळे व स्टाफ उपस्थित होते.
या रांगोळी स्पर्धेसाठी सोलापूर जिल्ह्यातील ७५ स्पर्धकांनी भाग घेतला त्यात पार्थ पवारांचे सुंदर चित्र रेखाटण्यात आले होते या स्पर्धेचे बक्षीस वितरण शिवआरोग्य संस्थेचे जिल्हा समन्वयक दीपक सुर्वे,मधुकर माने आयटीआय कॉलेजचे प्राचार्य डी.के.खराडे तसेच राष्ट्रवादीचे नेते उदय दादा माने यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या स्पर्धेचे विजेते म्हणून प्रथम पारितोषिक ही पूजा चंद्रकांत भाजीभाकरे यांना सोन्याची नथ मिळाली तर द्वितीय पारितोषिक सायली श्रीकांत जेधे मोडनिंब यांना पैठणी साडी,तृतीय पारितोषिक डिनर सेट हा नेहा संतोष वाघमारे टाकळी सिकंदर मोहोळ यांना मिळाले. पार्थ दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दि.२७ पासून सोलापूर जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये २१००० वह्यांचे वाटप राष्ट्रवादीचे नेते उदय दादा माने यांच्या मार्फत करण्यात येणार आहे.
-०-