maharashtrapoliticalsocialsolapur

अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे ॲक्शन मोडवर….

सोलापूर 

राज्य अन्न आयोग अध्यक्ष ह्यांची सोलापूर येथे दौरा असताना त्यांच्या कडे वादग्रस्त रास्त भाव धान्य दुकाना बाबतीत आलेल्या तक्रारीवरून अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ अधिकारी यांनी परिमंडळ ब विभागातील ११ दुकानाची तपासणी करण्यात आली होती.त्या ११ दुकानापैकी जुना घरकुल जवळ,गांधी नगर,अक्कलकोट रोड येथील साधना सर्व ग्राहक व्यवसाय संस्था ब-34 या दुकानाचे तपासणी केली असता पुढील प्रमाणे दोष आढळून आले,दुकानात जागा अपुरी असणे,दुकानात दर्शनी भागात बोर्ड नसणे,दप्तर अद्यावत नसणे,तसेच गहू ९. ५६  व तांदूळ १४.३५ इतके धान्य तफावत आढळल्याने शासकीय दराप्रमाणे धान्याची होणारी ८५,५५४/- इतकी किंमतीचे दंड आकारण्यात आला असून त्याशिवाय त्या रास्त भाव धान्य दुकानाचा परवाना तात्पुरत्या स्वरूपात सहा महिन्याकरिता निलंबन करण्यात आले आहे.

राज्य शासनाच्या वतीने गोरगरीब महिलांना वाटप करण्यात येणाऱ्या मोफत साड्यांचे परस्पर विल्हेवाट लावण्याचे सावळा गोंधळ परिमंडळ विभागात घडत असल्याचे प्रसारमाध्यमातून बातमी झळकताच अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी ॲक्शन मोडवर येत भरारी पथकाची नेमणूक केली असून आज गुरुवार रोजी या भरारी पथकाचे प्रमुख परिमंडळ अधिकारी नंदकिशोर डोके व पुरवठा निरीक्षक राजेश यमपुरे यांनी दिवसभरात एकूण सहा दुकानाची तपासणी करण्यात आली असून एकंदरीत परिमंडळ अ विभागात ६० इतके दुकान आहे. लवकरच इतर सर्वच दुकानदारांचे काटेकोरपणे तपासणी करण्यात येणार व दोषी दुकानावर कारवाई करणार असल्याचे अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे ह्यांनी कळविले आहे.

आपल्या दुकानात अचानक आलेल्या भरारी पथकाला पाहून दुकानदारांचे चांगलेच धाबे दणाणलेले आहेत.
मागील दोन महिन्यात असेच अवैधरित्या घरगुती गॅस भरणाऱ्या पॉईंट वर भरारी पथकामार्फत धाड टाकून कारवाई करण्यात आली.
मागील काही दुकान दिवसातच आपल्या पुरवठा क्षेत्रात शासकीय योजनाचे मोहीम प्रभावी पणे राबवित, दोषी रास्त भाव धान्य  दुकान व अवैध्य गॅस पॉइंटवर बेधडक कारवाई करणाऱ्या अन्नधान्य वितरण अधिकारी आता परिमंडळ अ विभागात होणाऱ्या सावळ्या गोंधळ घालणाऱ्या रास्त भाव धान्य दुकानावर कारवाई करणार का याकडे सर्व शहरवासीयांचे लक्ष वेधून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button