” मालकांच्या” हातात वॉकी-टॉकी….
बाजार समितीच्या प्रशासनाच्या प्रशस्त कारभारात वॉकी टॉकीच्या निर्णयामुळे यंत्रणा राहणार सतर्क....

सोलापूर (प्रतिनिधी)
श्री.सिध्देश्वर बाजार समितीच्या कामकाजाचे सुलभतेसाठी प्रशासन,विभागप्रमुख व सुरक्षा यंत्रणेच्या सदैव संपर्कात राहण्यासाठी वॉकी-टॉकी यंत्रणा कार्यान्वित केली असून गेटवर होणारी वाहनाची गर्दी,अपघात,चोरी,प्रकार टाळण्यासाठी ही यंत्रणा हायटेक ठरणार असल्याचे सभापती दिलीपराव माने यांनी सांगितले.
श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती माने यांनी पुन्हा पहाटे जाऊन कामकाजाची पाहणी केली.याचवेळी प्रशासन,विभाग प्रमुख,सुरक्षा रक्षक व सुरक्षा यंत्रणेशी त्वरित संपर्कासाठी वॉकी-टॉकी यंत्रणा कार्यान्वित केली.यामुळे बाजार समितीच्या कानाकोपऱ्यात यंत्रणेशी संवाद साधला जाणार असुन गेटवर ट्रॅफिक,मालाची चोरी,यावर नियंत्रण ठेवता येणार असून गर्दी,गडबड,गोंधळ टाळण्यास मदत होणार आहे.

तंत्रज्ञानाचे मदतीने सुरक्षितता आणि शिस्त राहणार असल्याने वॉकी-टॉकी यंत्रणेचे व दिलीपराव माने यांनी बाजार समितीच्या प्रशासकीय कामकाजात केलेल्या अमुलाग्र बदलाचे शेतकरी व्यापारी वर्गातून कौतुक होत आहे. यावेळी बाजार समितीचे माजी संचालक केदार उंबरजे,सचिव अतुल रजपूत,सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.




